Eknath Shinde : मागील दोन दिवसांपासून राज्यसेवा आयोगाच्या परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. पुण्यात कालपासून आंदोलक विद्यार्थी ठाण मांडून आहेत.काल (दि.२१ फेब्रु.) रोजी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी रात्री साडेअकराच्या दरम्यान आंदोलनस्थळी येऊन, त्यांच्या मागण्या, त्यांचे प्रश्न सोडवणार याची ग्वाही आंदोलकांना दिली. यावेळी पवारांनी फोनवर आंदोलक विद्यार्थ्यांशी मुख्यंमंत्र्यांशी संवाद घडवून आणला.
राज्यसेवा आयोगाचा बदलवण्यात येणार अभ्यासक्रम हा यंदापासून नको तर २०२५ सालापासून लागू करावा, अशी मुख्य मागणी आंदोलक विद्यार्थ्यांची आहे. मात्रयाच मुद्द्यावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गोंधळ उडालेला दिसून आला.
मुख्यमंत्री म्हणाले, "एमपीएसीच्या विद्यार्थ्यांबाबत मी स्वत: काल फोनवर बोललो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा विद्यार्थ्यांशी बोललेले नाहीत. जी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. तीच भूमिका सरकारची आहे. विद्यार्थ्यांशी सरकार सहमत आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीबाबत निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. कळवलेलं आहे. आणि निवडणूक आयोगाकडून सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. "
यावेळी राज्य आयोग असा उल्लेख करण्याऐवजी मुख्यमंत्र्याकडून निवडणूक आयोग असा उल्लेख झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आता मुख्यमंत्र्यांना चिमटा काढण्यात आलं आहे. राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून मुख्यमंत्र्याच्या हा गोंधळ उडालेला व्हिडीओ पोस्ट करून, एकप्रकारे त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
ट्विट करताना राष्ट्रवादीने म्हंटले आहे की, "यांना उठता, बसता, खाता, पिता, झोपता, जागता, जाता, येता, बोलता फक्त आणि फक्त निवडणूक आयोगच दिसतो वाटतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांचे निवेदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्याऐवजी निवडणूक आयोगाला पाठवले, यातच सगळे आले," असा चिमटा मुख्यमंत्र्यांना काढण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.