Supreme Court hearing : सिब्बलांच्या युक्तीवादावर सरन्यायधीशांचा महत्त्वाचा प्रश्न; सिब्बल म्हणाले...

Shivsena News : विधिमंडळातील पक्षाकडून राजकीय पक्षाचे धोरण ठरवले जाऊ शकत नसल्याचे सिब्बल म्हणाले.
Supreme Court Hearing News
Supreme Court Hearing NewsSarkarnama
Published on
Updated on

Supreme Court hearing : राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरुवात झाली आहे. आज सुनावणीच्या दुसऱ्या दिवशीही ठाकरे गटाकडून अ‌ॅड. कपिल सिब्बल युक्तीवाद करत आहेत. दुपारच्या सुट्टीनंतर न्यायालयाचे कामकाज पुन्हा सुरु झाले आहे. त्यामध्ये कपिल सिब्बल म्हणाले, फक्त 38 आमदार केवळ विधिमंडळातील पक्ष आहे, संपूर्ण राजकीय पक्ष नाही.

38 आमदार पक्षाचे धोरण ठरवू शकत नाहीत. पक्षाशिवाय 38 आमदारांचे अस्तित्व काय आहे? त्यांनी एक उदारहन दिले. ते म्हणाले, राजकीय पक्ष म्हणजे आई आहे. विधिमंडळातील पक्ष म्हणजे बाळ आहे. या दोन्ही गोष्ट नाळेनी जोडलेल्या आहेत. विधिमंडळातील पक्षाकडून राजकीय पक्षाचे धोरण ठरवले जाऊ शकत नसल्याचे सिब्बल म्हणाले.

Supreme Court Hearing News
Supreme Court hearing : 38 आमदार पक्षाचे धोरण ठरवू शकत नाहीत; पक्षाशिवाय त्यांचे अस्तित्व काय? सिब्बलांचा युक्तीवाद

पक्षाने जारी केलेला व्हीप विधिमंडळातील पक्षाला पाळावाच लागेल. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत व्हीपचे उल्लंघन करून शिंदे गटाने केलेले मतदान हा अप्रामाणिकपणा असल्याचे सिब्बल म्हणाले. विधिमंडळातील आमदारांवर पक्षाचा कंट्रोल असतो. पक्षाचे धोरण महत्त्वाचे असे, असेही सिब्बल यांनी सांगितले. राजकीय पक्षांची भूमिका विधिमंडळ पक्षाला समजावून सांगणे, हे पक्ष प्रतोदाचे काम असते, असा युक्तीवाद कपिल सिब्बल करत आहेत.

विधिमंडळ पक्ष प्रतोदांना आव्हान देऊ शकत नाहीत. अधिवेशनादरम्यान पक्षच विधिमंडळातले धोरण ठरवत असतो. सभागृहातील आमदार स्वत:साठी नसतो. पक्षासाठी असतो. एखाद्या धोरणाला विरोध करायचा असले तर हा व्हीप जारी व्हायच्या आधी केला जाऊ शकतो. मात्र, नंतर पक्षाचे आदेश आमदारांना पाळावे लागतात.

Supreme Court Hearing News
Supreme Court hearing : जुने सरकार किंवा जुने अध्यक्ष परत आणा, सिब्बलांच्या या युक्तीवादावर न्यायाधीश म्हणाले...

त्यावर सरन्यायधीश धनंजय चंद्रचूड यांनी कपिल सिब्बल यांना प्रश्न विचारला, पक्षात एखादी व्यक्ती दु:खी असेल तर त्याने काय करावे? त्यावर कपिल सिब्बल म्हणाले, तुम्ही शिवसेनेचे सदस्य असल्याचे घोषित करता, तेव्हा तुम्ही स्वाभाविकपणे शिवसेनेच्या घटनेखाली असले पाहिजे. शिवसेनेचे संविधान तुम्हाला तुमचा आवाज व्यक्त करण्याची आणि पाठिंबा मिळवण्याची मुभा देते. सरन्यायाधीशांनी मला एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला- याचे उत्तर रामानंद रेड्डी यांच्या च्या निकालात आहे, असे सिब्बल यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com