Mohit Kamboj sarkarnama
मुंबई

मोहित कंबोज यांना आमदारकीची लॉटरी ? ; भाजपच्या यादीत 'या' नेत्यांची नावे

मोहित कंबोज यांच्यासोबत पंकजा मुंडे यांनाही आमदारकी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यात काही दिवसापासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याचा आज शेवटचा अंक आहे, काल (रविवारी) विधानसभा अध्यक्षपदासाठी झालेली निवडणूक शिंदे सरकारने (eknath shinde) जिंकली. त्यामुळे आता आजच्या बहुमत चाचणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (mohit kamboj news)

काल भाजपच्या (BJP) राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना १६४ मत मिळाली. आता शिंदे-फडणवीस सरकार राज्यपाल यांना १२ आमदार नियुक्तीसाठी यादी देणार असल्याची चर्चा आहे.

महाविकास आघाडी सरकार पाडण्यात मोहित कंबोज यांचा मोठा हात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कंबोज यांना राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत स्थान मिळणार असल्याची चर्चा आहे. याचमुळे मोहित कंबोज यांना आमदारकीची लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बंडखोर आमदारांसोबत मोहित कंबोज हे सुरत तसेच गुवाहाटीमध्येही होते.

मोहित कंबोज यांनी ठाकरे सरकार पाडण्यामागे महत्वाची भूमिका बजावली होती, मोहित कंबोज यांच्यासोबत पंकजा मुंडे यांनाही आमदारकी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच भाजपमध्ये अन्य नेत्यांची नावेही चर्चेत आहेत.

भाजपमधील या नेत्यांच्या नावांची चर्चा

सदाभाऊ खोत, चित्रा वाघ, पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, कृपाशंकर सिंह, मोहित कंबोज, माधव भंडारी, केशव उपाध्ये यांची नावे राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी सध्या चर्चेत आहे.

शिवसेना आमदार अजय चौधरी यांचे शिवसेना (Shivsena) गटनेते पद रद्द करण्यात आलं आहे. तर सुनील प्रभू यांचे मुख्य प्रतोद पद रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उप सचिवालयचे शिवदर्शन साठ्ये यांनी दिली आहे.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकीची परीक्षा शिंदे सरकार उत्तीर्ण झाले आहे. आता सर्वांचे लक्ष आहे ते आजच्या फायनलकडे. कालची आकडेवारी ध्यानी घेता शिवसेना-भाजपा युती सरकारकडे 164 आमदारांचे पाठबळ आहे. शिवाय, आजारपणामुळे कालच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी न झालेले भाजपाचे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या दोघांचीही मते शिंदे सरकारच्या पारड्यातच राहतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT