Eknath Shinde News  Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde News : मुख्यमंत्र्यांनी केला ज्यांचा आमदार असा उल्लेख ते तर माजी आमदार... ; शिंदेंची झाली गफलत!

Eknath Shinde Statement About EX MLa Ravindra Phatak : घाई-गडबडीत तसेच चुकून बोलण्याच्या ओघात मुख्यमंत्र्यांनी केलं माजी आमदाराला आमदार..

Pankaj Rodekar

Thane News : साताऱ्याच्या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी ठाण्यात म्हाडाच्या घरांची सोडत काढण्यात आली, अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांसाठी या कार्यक्रमाला हजर राहिलेल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांची नावे घेताना घाई-गडबडीत तसेच चुकून बोलण्याच्या ओघात रवींद्र फाटक यांचा आमदार असा उल्लेख केला, तर त्यापूर्वी ठाण्यात महायुतीच्या झालेल्या मेळाव्यात भाषण करताना माजी महापौर नरेश म्हस्के यांनीही अशाच प्रकारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख केला होता. (Latest Marthi News)

अयोध्या नगरीत राममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी ठाणे शहरात लावण्यात आलेल्या फलकांवर रवींद्र फाटक यांनी आपला उल्लेख आमदार असा केला होता. मात्र, विधान परिषदेवरील त्यांच्या आमदारकीचा कालावधी संपल्याने ते आता माजी आमदार झाले आहेत. तरीसुद्धा त्यांनी आपला आमदार असे उल्लेख केला असल्याची बातमी त्यावेळेस "सरकारनामाने" लावली होती. त्यानंतर मात्र फाटक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देणाऱ्या बॅनर्सवर फक्त रवींद्र फाटक (Ravindra Phatak) असाच उल्लेख केल्याचे दिसून आले.

त्यातच शनिवारी ठाण्यात पार पडलेल्या म्हाडाच्या घरांच्या सोडतीत मुख्यमंत्री शिंदे यांनी घाईगडबडीत इतर मंत्रिमंडळातील सदस्यांचे नाव घेताना, फाटकांचा आमदार असा उल्लेख केला. त्यामुळे अशाप्रकारे माजी महापौर म्हस्के यांच्याकडून महायुतीच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख केल्याची आठवण झाली.

राजकीय नेत्यांकडून भाषण देताना अनेकदा बोलण्याच्या नादात वादग्रस्त विधानं केली जातात, तर कधी नेत्यांची पदं चुकवली जातात. नेत्यांनाही लाजवेल असं गुणगान गायलं जातं. असंच काहीसं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून शनिवारी ठाण्यात झाले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT