Eknath Shinde&Team Sarkarnama
मुंबई

बंडखोरांमध्ये मतभेद : दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे लागणार ? ; २० ते २५ आमदारांमध्ये नाराजी

सत्तास्थापनेसाठी बंडखोर आमदारांचा स्वतंत्र गट कायदयात बसत नाही, म्हणून हा पर्याय एकनाथ शिंदे गट स्वीकारणार असल्याची चर्चा आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (shivsena) बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी सध्या महाविकास आघाडीतील अनेक बडे नेते फोनवरुन त्यांच्या संपर्कात आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल एका मुलाखतीत सांगितले . (maharashtra political crisis)

बंडखोरांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु असताना नवीन माहिती समोर येत आहे. दुसऱ्या पक्षात जाण्यावरुन गुवाहाटीत मुक्कामास असलेल्या आमदारांपैकी २० ते २५ आमदारांमध्ये मतभेद झाल्याची माहिती समोर येत आहे.

दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे लागेल, या मुद्यावरुन या आमदारांमध्ये मतभेद झाल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले. सत्तास्थापनेसाठी बंडखोर आमदारांचा स्वतंत्र गट कायदयात बसत नाही, म्हणून हा पर्याय एकनाथ शिंदे गट स्वीकारणार असल्याची चर्चा आहे.

'महाविकास आघाडी भक्कम राहील,' असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिल्व्हर ओक येथे आघाडीच्या नेत्यांसाबत आज झालेल्या बैठकीनंतर व्यक्त केला आहे. शिवसेनेत (shiv sena) झालेल्या बंडाचा आज सहावा दिवस आहे.

बंडखोरांना समर्थन देणाऱ्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यास शिवसेनेनं सुरवात केली आहे. आता नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्‍ती करून बंडखोरांना शह देण्‍याची रणनीती आखली आहे. दोन जणांवर शिवसेनेनं कारवाई केली आहे. त्यांना पदावरुन हटविण्यात आले आहे.

अलिबाग, मुरूड, पेण, पाली या भागाच्‍या जिल्‍हाप्रमुखपदाची जबाबदारी आमदार महेंद्र दळवी होती, मात्र ते एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झाल्याने शिवसेनेने त्यांच्यावर कारावाई करीत त्यांना जिल्हाप्रमुख पदावरुन हटवले आहे. त्यांच्याजागी अलिबागचे सुरेंद्र म्‍हात्रे यांची जिल्‍हाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे.

दळवी यांचे समर्थन करणारे अलिबागचे तालुकाप्रमुख राजा केणी यांनाही पदावरून हटविण्यात आले आहे. त्‍यांच्‍या जागी शंकर (महेश) गुरव यांची नेमणुक करण्यात आली आहे. अलिबाग आणि पेण या दोन मतदारसंघांच्‍या सहसंपर्कप्रमुखपदी किशोर जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT