शिवसेनेचं मोठं पाऊल ; शिंदे गटातील एका आमदाराची हकालपट्टी

कोकणातील शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदेंना समर्थन देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
Udhav Thackeray, Mahendra Dalvi
Udhav Thackeray, Mahendra Dalvisarkarnama

रायगड : शिवसेनेत (shiv sena) झालेल्या बंडाचा आज सहावा दिवस आहे. बंडखोर आमदार गुवाहाटी(आसाम) येथे एका हॉटेलमध्ये मुक्कामास आहे. येथून रोज आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आपल्या समर्थकांशी संवाद साधणार आहे. तर दुसरीकडे शिवसेना आता सक्रिय झाली आहे.

बंडखोरांना समर्थन देणाऱ्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यास शिवसेनेनं सुरवात केली आहे. आता नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्‍ती करून बंडखोरांना शह देण्‍याची रणनिती आखली आहे.

कोकणातील शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदेंना समर्थन देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील दोन पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेनं घरचा रस्ता दाखवला आहे. त्यांना पदावरुन हटविण्यात आले आहे. यासाठी ज्येष्ठ शिवसैनिक रिंगणात उतरले आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय पटलावरुन गायब झालेले माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते हेही सक्रिय झाले आहेत. बंडखोर गटाला शह देण्‍यासाठी गीते हे कोकणाचा दौरा करीत आहेत. कुठल्याही परिस्थितीत बंडखोरांना पराभूत करणार असा निर्धार गीते यांनी केला आहे.

Udhav Thackeray, Mahendra Dalvi
शिवसेनेला मोठा झटका ; राष्ट्रवादीवर आरोप करुन जिल्हाप्रमुखाचा सेनेला 'जय महाराष्ट्र'

आमदार महेंद्र दळवींची हकालपट्टी

अलिबाग, मुरूड, पेण, पाली या भागाच्‍या जिल्‍हाप्रमुखपदाची जबाबदारी आमदार महेंद्र दळवी होती, मात्र ते एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झाल्याने शिवसेनेने त्यांच्यावर कारावाई करीत त्यांना जिल्हाप्रमुख पदावरुन हटवले आहे. त्यांच्याजागी अलिबागचे सुरेंद्र म्‍हात्रे यांची जिल्‍हाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे.

राजा केणी यांनाही हटविलं

आमदार महेंद्र दळवी यांचे समर्थन करणारे अलिबागचे तालुकाप्रमुख राजा केणी यांनाही पदावरून हटविण्यात आले आहे. त्‍यांच्‍या जागी शंकर (महेश) गुरव यांची नेमणुक करण्यात आली आहे. अलिबाग आणि पेण या दोन मतदारसंघांच्‍या सहसंपर्कप्रमुखपदी किशोर जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघावर गेली अनेक वर्षे शेकापचे वर्चस्व होते. एखादा अपवाद वगळता नेहमी शेकापचा आमदार विधानसभेत निवडून आला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून महेंद्र दळवी याना उमेदवारी दिली होती. यात ते विजयी झाले आहे.

ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. "अडीचवर्षे आपल्या संघटनेची "राष्ट्रवादी" गळचेपी चाललेय त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. जय महाराष्ट्र!", असं नरेश म्हस्के यांनी टि्वट केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com