sanjay raut,eknath shinde sarkarnama
मुंबई

एकनाथ शिंदेंची वेळ निघून गेली, आता निर्णय ठाकरेचं घेतील !

एकनाथ शिंदेंना अनेक संधी दिल्या. पण ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले, आता ती वेळ निघून गेली.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्याचे नगरविकासमंत्री, शिवसेनेचे (Shiv Sena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंडखोरी केल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. बंडखोर शिंदे गटाने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने नव्या पक्षाची घोषणा केली आहे. 'शिवसेना बाळासाहेब'असे त्यांनी नामकरण केले आहे. (Eknath Shinde news update)

आज बंडाचा सहावा दिवस आहे. हे बंडखोर आमदार गुवाहाटी(आसाम) येथे एका हॉटेलमध्ये मुक्कामाला आहे. येथून रोज आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आज शिंदे गट आपल्या समर्थकांशी संवाद साधणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला परत येण्याची आवाहन केले आहे. पण शिंदे गट आपल्या भूमिकेवर ठाम आहे. 'महाविकास आघाडीतून बाहेर पडा,' अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान संजय राऊत यांनी शनिवारी (ता.२५) 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत शिंदे गटाच्या आमदारांवर तोफ डागली.

"शिवसेनेच्या पाठीवर अनेक वार झाले आहेत. ते पेलवण्याची जबाबदारी होती. बाळसाहेब ठाकरेंनी गद्दारांना कधी माफ केले नाही. एकनाथ शिंदेंना अनेक संधी दिल्या. पण ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले, आता ती वेळ निघून गेली. जो निर्णय घ्यायचा तो पक्षप्रमुख घेतील," असे सांगत शिंदे गटाला 'मातोश्री'चे दार बंद केल्याचे राऊतांनी सूचित केले आहे.

"जे आमदार शिवसेनेतून निवडून आले त्यांनी बंड केले. शिवसेनेने मेहनतीने या आमदारांना मोठे केले आहे. आज त्यांनी बंड केले. आज जे शिवसेनेच्या विचाराने निवडणूक लढवली. पुन्हा जनता या आमदारांना मतं देणार नाही," असे राऊत म्हणाले.

शिवसेनेची काल (शनिवारी) उच्चस्तरीय बैठक झाली. यात उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, "शिंदे पूर्वी नाथ होते, पण आता दास झाले आहेत. बंडखोरांच्या बुडाशी बॉम्ब आहे. बाळासाहेबांचे नाव घेऊन कोणी राजकारण करू शकणार नाही,"

उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत सहा ठराव मंजूर करण्यात आले. बंडखोर शिंदे गटाने 'शिवसेना बाळासाहेब' नावाने नव्या पक्षाची घोषणा केली आहे. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना बाळासाहेबांची आहे. बाळासाहेबांचे नाव कुणालाही वापरू दिले जाणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT