Eknath Shinde News in Marathi  sarkarnama
मुंबई

जखमी वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले 'एकनाथ' ; स्वखर्चाने करणार उपचार

मुख्यमंत्री शिंदे यांचा एक व्हिडिओ कालपासून समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : आषाढी वारी अगदी 2-3 दिवसांवर येऊन ठेपली आहे. काल मिरज येथे घडलेल्या अपघातामुळे यंदाच्या वारीला गालबोट लागलं होतं. मात्र वारकऱ्यांच्या मदतीला खुद्द 'एकनाथ' धावून आल्याने सर्वसामान्य लोकांच्या मदतीसाठी तत्पर असलेला मुख्यमंत्री अशी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची ओळख नव्याने अधोरेखित झाली आहे.(Eknath Shinde News in Marathi)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या कामाचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा एक व्हिडिओ कालपासून समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत (Video) ते अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांना लागेल ती मदत करा मी आहे, असं बोलताना दिसत आहेत.

सांगली येथे अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. मिरजचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून या अपघाताबाबत माहिती घेऊन या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी फाट्याजवळ काल एक भीषण अपघात घडला. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पीकअप जीप घुसून झालेल्या या अपघातात 14 वारकरी जखमी झाले. जखमींना तातडीने मिरज सिव्हिल आणि कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मिरजेचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश शिंदे यांना फोन लावून या वारकऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यासोबत त्यांना लागतील ते सर्व उपचार करावेत. वेळ पडल्यास त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करावे त्यांच्यावरील उपचारात कोणतीही कसूर ठेवू नका, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यासाठी लागेल तो खर्च उचलण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली.

"अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर आवश्यक ते सगळे उपचार करण्यात येतील," असे डॉ.शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.ओळख नव्याने अधोरेखित झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या कामाचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा एक व्हिडिओ कालपासून समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत (Video) ते अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांना लागेल ती मदत करा मी आहे, असं बोलताना दिसत आहेत.

सांगली येथे अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. मिरजचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून या अपघाताबाबत माहिती घेऊन या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी फाट्याजवळ काल एक भीषण अपघात घडला. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पीकअप जीप घुसून झालेल्या या अपघातात 14 वारकरी जखमी झाले. जखमींना तातडीने मिरज सिव्हिल आणि कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मिरजेचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश शिंदे यांना फोन लावून या वारकऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यासोबत त्यांना लागतील ते सर्व उपचार करावेत. वेळ पडल्यास त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करावे त्यांच्यावरील उपचारात कोणतीही कसूर ठेवू नका, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यासाठी लागेल तो खर्च उचलण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली.

"अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर आवश्यक ते सगळे उपचार करण्यात येतील," असे डॉ.शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT