गुलाबराव हे आयत्या बिळावरचे नागोबा ; हिम्मत असेल तर शिवसेना सोडा ; राऊतांचे आव्हान

गुलाबरावांसह माझे त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना आव्हान आहे की, त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी शिवसेना सोडल्याचे जाहीर करावं.
गुलाबराव हे आयत्या बिळावरचे नागोबा ; हिम्मत असेल तर  शिवसेना सोडा ; राऊतांचे आव्हान
Published on
Updated on

रत्नागिरी : शिवसेनेचे (shivsena) बंडखोर आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाचे असल्याचा दावा केला आहे, यावर शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत (vinayak raut) संतापले. त्यांनी गुलाबराव पाटलांचा चांगलाच समाचार घेतला. (Gulabrao Patil news update)

विनायक राऊत म्हणाले, "गुलाबराव पाटील यांनी धनुष्यबाण चिन्ह निर्माण केले नाही, ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केले आहे. गुलाबराव कोण होते? ते आयत्या बिळात बसून नागोबा झाले, मंत्री झाले. त्यांना धनुष्य़बाण चिन्ह घेण्याचे नैतिक अधिकार नाही. गुलाबरावांसह माझे त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना आव्हान आहे की, त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी शिवसेना सोडल्याचे जाहीर करावं,"

शिवसेनेचे माजी आमदार हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. त्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विनायक राऊत म्हणाले, "उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे. ज्यांना मनापासून राहायचे आहे, त्यांनी माझ्यासोबत राहा. तुम्हाला दुसरीकडे उज्जल भविष्यकाळ असेल तर जा.आम्ही जबरदस्ती करणार नाही,"

एकनाथ शिंदेंना ठाणे विधानसभेची उमेदवारी कशी मिळाली, याबाबत विनायक राऊत यांनी जुना किस्सा पत्रकारांना सांगितला. विनायक राऊत म्हणाले, "मी जर त्यांचे नाव बाळासाहेबांना सूचवलं नसतं तर एकनाथ शिंदेंना आमदारकी मिळाली असती का, हे त्यांनी त्यांच्या आई-वडीलांची शपथ घेऊन सांगावं,"

गुलाबराव हे आयत्या बिळावरचे नागोबा ; हिम्मत असेल तर  शिवसेना सोडा ; राऊतांचे आव्हान
एकनाथ शिंदेंना आमदार केलं, हे माझ्या आयुष्यातील मोठं पाप ; राऊतांना पश्चाताप

"मी ज्यावेळी ठाणे शहराचा संपर्कप्रमुख होतो, तेव्हा एकनाथ शिंदे हे सभागृहाचे गटनेते होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांनी तेव्हा तत्कालीन शिवसेना नेते सतीश प्रधान यांना गुलाल लावून एबी फार्म दिला होता. पण मी मध्यस्थी केली, बाळासाहेबांना सांगितले की, सतीश प्रधानांना राज्यसभा खासदार करा, विधानपरिषदेची आमदारकी द्या. एकनाथ शिंदे तरुण आहेत, त्यांना ठाणे विधानसभेची उमेदवारी दिली, तर ती भविष्य़ात उपयोगी ठरेल, पण आज पश्चाताप होतोयं, ते माझ्या आयुष्यातील मोठं पाप होतं,"

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. रिक्षाच्या स्पीडपेक्षा मर्सिडीजचा स्पीड फिका पडला, असे त्यांनी लिहिल्याचे खासदार विनायक राऊत यांना माध्यमांनी सांगितलं. त्यावर राऊत म्हणाले "एकनाथ शिंदे यांची विद्वत्तेबद्दल संशोधन करावं लागेल. कुणीतरी लिहून देतं म्हणून ते टि्वट करतात. ते स्वतः कधी टि्वट करतात का, त्यांना टि्वट तरी लिहिता येते का, याचा अभ्यास करावा लागेल,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com