Mumbai News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फायरब्रँड नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 31 ऑक्टोबरला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या प्रकृतीत गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याची माहिती दिली होती. यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
एकीकडे त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच पंतप्रधान मोदींपासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत सर्वांनी राऊतांच्या तब्येतीची विचारपूस करतानाच त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थनाही केली आहे. याचदरम्यान,आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली असल्याची माहिती समोर येत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही (Eknath Shinde) संजय राऊतांची तब्येतीची विचारपूस केली आहे. शिंदेंनी राऊतांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांना फोन लावत खासदार संजय राऊतांच्या तब्येतीबाबत माहिती घेतल्याचं माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील बंडानंतर राऊत विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा शाब्दिक 'सामना' नेहमीच पाहायला मिळाला आहे. संजय राऊत हे नेहमीच शिंदेंच्या शिवसेनेवर वाट्टेल त्या भाषेत कडवट शब्दांत टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडूनही राऊतांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं जातं.
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यातून विस्तवही जात नाहीत. संजय राऊतांनी शिवसेना फुटल्यानंतर संकटकाळात उद्धव ठाकरेंची पूर्णपणे साथ दिली आहे. याचमुळे त्यांचे अनेकदा शिंदेंच्या शिवसेनेसोबत शाब्दिक चकमकी उडताना दिसून येतात. पण आत्ता सर्वप्रकारचे राजकीय मतभेद बाजूला सारून उपमु्ख्यमंत्री शिंदे यांनी एकेकाळचे जिवलग मित्र आणि सध्याचे कट्टर विरोधक असलेल्या राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.
शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांची प्रकृती अचानक बिघडली. संजय राऊत यांनी सोशल मीडियातून आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती.डॉक्टरांनी त्यांना घराबाहेर पडण्यास मज्जाव केला आहे. आपल्या प्रकृतीबाबत नेमकं काय झालंय? हे त्यांनी स्वतः एका निवेदनाद्वारे सांगितलं आहे. पण यात त्यांनी आपण थेट पुढच्या वर्षीच भेटणार असल्याचं म्हटल्यानं खळबळ उडाली.
सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत. मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे, मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन, असे राऊतांनी पोस्टमध्ये म्हटले होते.
सोशल मीडियातील या पोस्टनंतर राऊतांना पाच दिवसांनी बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरूवारी त्यांनी सोशल मीडियात पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्या हाताला सलाईन लावल्याचे दिसत आहे. तसेच हातात पेन असून हाताखाली मजकूर लिहिलेला कागदही आहे.
राऊतांनी म्हटले आहे की, ‘हात लिहिता राहिला पाहिजे. कसेल त्याची जमीन, लिहील त्याचे वृत्तपत्र... हा आमच्या पिढीचा मंत्र होता!’ त्यांनी ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रासाठी लेख लिहिल्याचे दिसत आहे. न्यूयॉर्कच्या महापौरपदी भारतीय वंशाचे जोहरान ममदानी निवडून आले आहेत. याच विषयावर त्यांनी लेखन केल्याचे मजकुरावरून दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.