Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation : माजी महापौर, उपमहापौरांचे प्रभाग आरक्षित; घोडेले, शिंदेंना करावी लागणार शोधाशोध!

Local Body Election 2026 : घोडेले यांनी मोठ्या आशेने काही महिन्यापुर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र आता प्रभागातील तीनही वार्ड हे महिला राखीव झाल्याने घोडले यांची संधी हुकली आहे.
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Reservation News
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Reservation NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या नव्या आरक्षण यादीत माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि उपमहापौर राजू शिंदे यांच्या प्रभागांचे आरक्षण महिलांसाठी घोषित झाले.

  2. या आरक्षणामुळे अनेक दिग्गज नेत्यांना आपल्या गडातून बाहेर पडावे लागणार आहे.

  3. राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलल्याने आगामी महापालिका निवडणुकीत नवीन चेहरे उदयास येण्याची शक्यता आहे.

Ward Reservation Draw News : राज्यात महापालिका निवडणुकांसाठी आज प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आल्या आहेत. मुंबईसह राज्यातील मोठ्या महापालिकेत दिग्गजांचे काय होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील 29 प्रभागातील 115 वार्डांसाठी आज प्रारूप आरक्षण सोडती जाहीर करण्यात आल्या. माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी उपमहापौर राजू शिंदे, माजी सभापती दिलीप थोरात आणि नगरसेवक कैलास गायकवाड या काही प्रमुख नेत्यांची आरक्षणात दांडी उडाली आहे.

माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या प्रभागातील तीनही वार्ड हे महिलांसाठी राखीव झाले आहेत. एससी, ओबीसी आणि खुला अशा तीनही प्रवर्गात महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. खुल्या प्रवर्गातून नंदकुमार घोडेले यांच्या पत्नी माजी महापौर अनिता घोडेले यांना संधी मिळू शकते. मात्र नंदकुमार घोडेले यांना दुसरा प्रभाग शोधावा लागणार आहे.

घोडेले यांनी मोठ्या आशेने काही महिन्यापुर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र आता प्रभागातील तीनही वार्ड हे महिला राखीव झाल्याने घोडले यांची संधी हुकली आहे. आत ते पत्नीला पुन्हा निवडणुकीत उतरवता की मग इतर कोणाला संधी दिली जाते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे माजी उपमहापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून भाजपात प्रवेश केलेले राजू शिंदे यांच्या प्रभागातही दोन वार्ड हे महिला राखीव तर दोन सर्वसाधारण पुरूषांसाठी राखीव झाले आहेत.

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Reservation News
Chhatrapati Sambhajinagar: प्रभागरचनेवर भाजपचा प्रभाव; शिवसैनिक अस्वस्थ

एससीसाठी एकाही वार्डात आरक्षण न निघाल्याने राजू शिंदे यांना नवा प्रभाग शोधावा लागणार आहे. महापालिकेच्या राजकारणात स्वतःचा ठसा उमटवणाऱ्यांपैकी नंदकुमार घोडेले, राजू शिंदे हे ओळखले जातात. या दोन दिग्गजांची दांडी नव्या आरक्षणाने उडाली आहे. आता महापालिकेतील एन्ट्रीसाठी ते कोणता पर्याय स्वीकारतात? हे पहावे लागेल. राजू शिंदे यांच्या प्रमाणाचे भाजपचे माजी सभापती दिलीप थोरात, माजी नगरसेवक कैलास गायकवाड यांचे प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांचीही अडचण झाली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Reservation News
Shivsena News : निवडणुकीपूर्वीच संजय शिरसाट यांच्या लेकाला 'महापौरपदासाठी' शुभेच्छा : छत्रपती संभाजीनगरात इच्छुकांमध्ये अस्वस्थता

या शिवाय आणखी काही नगरसेवक, महापालिकेतील माजी पदाधिकाऱ्यांना प्रारूप आरक्षण सोडतीत फटका बसल्याचे समोर आले आहे. बरीच वर्ष रखडल्यानंतर आता महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे पुन्हा महापालिकेत एन्ट्री करण्यास इच्छूक असणाऱ्यांच्या आशेवर आरक्षण सोडतीनंतर पाणी फिरले आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सभागृहात सकाळी अकरा वाजेपासून आरक्षण सोडती जाहीर करण्यात येत होत्या. मनपा प्रशासक जे. श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली या सोडती काढण्यात आल्या.

छत्रपती संभाजीनगर महापालिका आरक्षण सोडत २०२५

२९ प्रभाग ११५ वार्ड

अनुसूचित जाती २२- पैकी ११ महिला राखीव

अनुसूचित जमाती - २ पैकी १ महिला राखीव

ओबीसी ३१- पैकी १६ महिला राखीव

सर्वसाधारण ६० पैकी ३० महिला राखीव

FAQs

1. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आरक्षणात कोणते बदल झाले आहेत?
माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि उपमहापौर राजू शिंदे यांच्या प्रभागांसह अनेक प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले आहेत.

2. या आरक्षणाचा राजकारणावर काय परिणाम होणार आहे?
दिग्गज नेत्यांचे गढ गमावल्याने नव्या उमेदवारांना संधी मिळणार असून, राजकीय समीकरणात मोठा बदल होणार आहे.

3. आरक्षण कोणत्या निकषांवर ठरवले गेले आहे?
लोकसंख्या, अनुसूचित जाती-जमाती आणि महिला आरक्षणाचा प्रमाण यानुसार प्रभागांचे आरक्षण ठरवले गेले.

4. घोडेले आणि शिंदे यांच्यासाठी पुढचा पर्याय कोणता आहे?
ते आता अन्य प्रभागातून निवडणूक लढवण्याचा विचार करू शकतात किंवा पक्षाकडून नवीन जबाबदारी स्वीकारू शकतात.

5. नागरिकांची प्रतिक्रिया कशी आहे?
अनेक ठिकाणी आश्चर्य आणि नाराजी व्यक्त केली जात असून, काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार म्हणून स्वागत केले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com