Jayant Patil reacts to Sharad Pawar and Eknath Shinde meeting Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde: शरद पवारांच्या 'त्या' विधानामुळं एकनाथ शिंदे खूष! म्हणाले, चांगल्याला चांगलं...

Eknath Shinde: शरद पवार यांनी राज्य शासनानं जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीचं कौतुक केलं आहे. त्यामुळं सध्या विरोधकांकडून टीकटिपण्या सुरु असताना मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे हे मात्र खूष आहेत.

Amit Ujagare

Eknath Shinde: महाराष्ट्र शासनानं जून २०२६ मध्ये राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ मंजूर केली. यात सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना ₹३६,५८५ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येणार आहे. ही योजना अल्पमुदत पीक कर्जासाठी लागू असणार आहे. या कर्जमाफी योजनेचं शरद पवारांनी कौतुक केलं आहे. त्यांच्या कौतुकाच्या थापेमुळं मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे हे खूष आहेत. त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी पवारांच्या या कौतुकावर प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवारांनी नेमकं काय म्हटलंय?

शरद पवार म्हणाले, सरकारच्या निर्णयामुळं राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. सुरुवातीला असलेल्या जाचक अटी सरकारनं मागे घेतल्यामुळं त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आणि त्यांच्या भावनांचा आदर करणारा असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदेंकडून कौतुक

दरम्यान, एकीकडं शेतकरी कर्जमाफी योजनेच्या जाचक अटींवरुन विरोधकांनी सरकारला घेरलेलं असतानाच आता शरद पवारांनी कौतुक केल्यामुळं एकनाथ शिंदेही खूष आहेत. त्यांनी म्हटलं की, महायुती सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या मागे उभं राहीलं आहे. राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार आहे. आम्ही या योजनेतील ५० हजारांची अट कमी केली. त्यामुळं लाखो शेतकऱ्यांचं दोन लाखांपर्यंत कर्ज माफ होणार आहे. यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, ते चांगल्याला चांगलं म्हणणारे नेते आहेत. काही लोकांची सरकारनं कितीही चांगलं काम केलं तरी खोटं बोला पण रेटून बोला अशी वृत्ती विरोधी पक्षातील काही लोकांची आहे. त्याला पवार साहेब यांनी हे उत्तर दिलं आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT