Eknath Shinde : उद्धव ठाकरेंचा भाजपच्या हिंदुत्वावर घाव! प्रत्युत्तरासाठी एकनाथ शिंदे उतरले मैदानात; सिद्धीविनायक प्रकरणाची चौकशी लागणार?

Eknath Shinde : अयोध्येतील राम मंदिराच्या दानचोरीवरुन सध्या उद्धव ठाकरेंनी भाजपला चांगलंच कोंडीत पकडलं आहे. या प्रकाराविरोधात त्यांनी नुकतंच आंदोलनही केलं होतं.
Eknath Shinde | Uddhav Thackeray | Devendra Fadnavis
Eknath Shinde | Uddhav Thackeray | Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde : अयोध्येतील राम मंदिराच्या दानचोरीवरुन सध्या उद्धव ठाकरेंनी भाजपला चांगलंच कोंडीत पकडलं आहे. या प्रकाराविरोधात त्यांनी नुकतंच आंदोलनही केलं होतं. पण आता आपल्या मोठ्या भावाला आणि महाशक्तीला आव्हान देणाऱ्या ठाकरेंना खिंडीत पकडलं आहे. त्यांनी आता मुंबईतल्या सिद्धीविनायक मंदिरातील दानपेटीच्या लुटीचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी सध्या केवल हा मुद्दा उपस्थित केला असला तरी याप्रकरणी ठाकरेंच्या सहकाऱ्यांची चौकशी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Eknath Shinde | Uddhav Thackeray | Devendra Fadnavis
Atrocity Threat: थेट तहसीलदारांनाच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी; कागलमध्ये एकावर गुन्हा दाखल

शिंदेंनी नेमकं काय म्हटलंय?

विधानसभेत अधिवेशनाच्या समारोपाच्या भाषणांवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राम मंदिरातील दानचोरीच्या मुद्द्यावर बोलताना म्हटलं की, राम मंदिराच्या प्रकरणाचं कोणीही समर्थन करु शकत नाही. यामुळं राम भक्तांना अतिशय वेदना झालेल्या आहेत. यावर कठोर कारवाई होत आहे, मोदी आणि योगी हे कोणालाही सोडणार नाहीत, दोषींना ते तुरुंगात खडी फोडायला पाठवल्याशिवाय राहणार नाहीत. पण जे टीका करत आहेत त्यांच्या सहकाऱ्यांनी सिद्धीविनायकाच्या मंदिरातील दानपेटी लुटण्याचं पाप केलं तेव्हा चौकशीचे आदेश का दिले नाहीत.

Eknath Shinde | Uddhav Thackeray | Devendra Fadnavis
Uddhav Thackeray : ऑपरेशन टायगरचं वादळ नाशिकमध्ये धडकताच उद्धव ठाकरे सावध, खास शिलेदाराला तडकाफडकी नाशिकला धाडलं

आरोप खरे असते तर पळून गेले असते

दरम्यान, शिंदेंच्या या आरोपांना आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, जर सिद्धिविनायकाच्या दानपेटी लुटीचा आरोप खरे असते तर ज्यांच्यावर हे आरोप झाले ते त्यांच्यासोबत गुवाहाटीला पळाले असते. त्यांच्यावर भाजपनं जे आरोप केले होते तेव्हा ते पळपुट्यासारखे पळाले ते घाबरुन. सूरत, गुवाहाटी, गोवा आणि मग इथं येऊन ते मुख्यमंत्री बनले. एकंदर काय तर त्यांनी जे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस सुरु केलं आहे, त्याच्यामुळं तुमचं लक्ष विचलीत करण्यासाठी ते सर्वकाही करत आहेत. मी त्यांना एकच विचारतो की तुमच्यात हिंमत असेल आणि बाळासाहेबांच जर तुम्ही हिंदुत्व पाळत असाल तर त्यांनी मोदींना एकच प्रश्न विचारावा की राम मंदिर लुटणाऱ्या ट्रस्टींची नेमणूक कोणी केली होती?

Eknath Shinde | Uddhav Thackeray | Devendra Fadnavis
Shivsena-BJP Politics: औरंगाबाद जिल्हा बँकेत मोठा भाऊ ठरलेल्या शिवसेनेत अध्यक्ष पदावरून पुन्हा संघर्ष; भाजप संधी साधणार!

चौकशी लावणार का?

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटी लुटीचा जो मुद्दा उपस्थित केला आणि ठाकरेंच्या ज्या सहकाऱ्यांचा नाव न घेता उल्लेख केला ते सहकारी म्हणजे आदेश बांदेकर. कारण महाविकास आघाडीचं सरकार असताना आणि ठाकरे मुख्यमंत्री असताना सिद्धिविनायक मंदिराच्या अध्यक्षपदी बांदेकर यांनी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी भाजपनं या मंदिरातील दानपेटीतील संपत्तीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता.

पण आता राम मंदिराच्या प्रकरणामुळं शिंदेंनी बांदेकरांवरील आरोपांचं प्रकरण पुन्हा एकदा उकरुन काढलं आहे. त्यामुळं आता राज्यात महायुतीचं सरकार असल्यानं या सिद्धिविनायक प्रकरणाची चौकशी या सरकारकडून लावली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com