Eknath Shinde-Narendra Modi-Amit shah Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : मोठी बातमी! शिंदेंनी 'CM' पदासाठी दिल्लीत शेवटचा डाव टाकला; पण शाहांनी मोजक्याच वाक्यांत विषय संपवला

Mahayuti Politics : एकनाथ शिंदेंनी दिल्लीतील बैठकीत एकनाथ शिंदेंनी भाजप पक्षश्रेष्ठींकडून त्यांना लोकसभा निवडणुकीनंतर दिलेल्या शब्दाची आठवण करुन दिल्याचं एका वरिष्ठ नेत्यानं टाईम्स ऑफ इंडियाला सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ट्विस्टवर ट्विस्ट पाहायला मिळत आहे. महायुती सरकारकडून शपथविधी सोहळ्याच्या एक दिवस आधी सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला. तरीदेखील शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) नाराजी अद्याप पूर्णपणे दूर झालेली नसल्याची चर्चा आहे. ते सरकारमध्ये सहभागी होणार की नाही याबाबतचा सस्पेन्सही कायम आहे.

गृहखात्यासाठी अडून राहिलेल्या शिंदेंनी ठाण्यातील पत्रकार परिषदेनंतर दिल्लीत मुख्यमंत्रि‍पदासाठी अखेरचा डाव डाव टाकत आपल्याला 6 महिन्यांसाठी तरी मुख्यमंत्री करावं,अशी मागणी केली. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी (Amit Shah) ही मागणी फेटाळून लावताना मोजक्याच शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली.

महायुतीच्या निकालानंतर मुख्यमंत्री पद आणि खातेवाटपावरुन पेच निर्माण झाल्यानंतर महायुतीच्या प्रमुख नेत्यांची अमित शाहांच्या निवासस्थानी 28 नोव्हेंबरला महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीआधी एकीकडे स्वतंत्रपणे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात काही मिनिटं चर्चा झाली होती. त्यानंतर महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली होती.

याच बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आणखी सहा महिने आपल्याला महायुती सरकारचं मुख्यमंत्रिपद मिळावं,अशी मागणी केली होती. परंतू,अमित शाहांनी शिंदेंची ही मागणी फेटाळून लावताना सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्याची पद्धत नसून हा वाईट निर्णय ठरू शकतो. तसेच अशा निर्णयाचे प्रशासनावर नकारात्मक परिणाम होतील अशी भूमिका मांडली. या संदर्भातलं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं सूत्रांच्या माहितीनं दिलं आहे.

एकनाथ शिंदेंनी दिल्लीतील बैठकीत एकनाथ शिंदेंनी भाजप पक्षश्रेष्ठींकडून त्यांना लोकसभा निवडणुकीनंतर दिलेल्या शब्दाची आठवण करुन दिल्याचं एका वरिष्ठ नेत्यानं टाईम्स ऑफ इंडियाला सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे.शिंदेंनी दिल्लीतील बैठकीत विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं तर मुख्यमंत्री करण्यात येईल,हा शब्द दिल्याचं सांगत आपली बाजू मांडली आणि पुन्हा मुख्यमंत्री करावं अशी गळ घातली.

मात्र, भाजपनं शिंदेंची ही डिमांड फेटाळून लावली.भाजप बहुमताच्या अगदी जवळ असून या परिस्थितीतही भाजपचा मुख्यमंत्री न झाल्यास कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल,असं शिंदेंना सांगण्यात आल्याचंही माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसमोर शिवसेनेची भूमिका मांडताना शिवसेनेला गृह,नगरविकाससह महत्वाच्या 12 मंत्रिपदांची मागणी केली होती. विधान परिषदेच्या सभापतीपद आणि पालकमंत्री पद देतानाही पक्षाचा योग्य तो सन्मान राखला जावा अशी विनंतीही शिंदेंनी शहांना केल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT