
Jalna News : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अखेर 12 व्या दिवशी महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला आहे.महायुतीला प्रचंड बहुमत मिळालेले असताना, त्यातही भाजपला विक्रमी आणि सर्वाधिक 132 आणि महायुतीला 230 जागा मिळूनही सत्तास्थापनेचा दावा आणि मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा पेच निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. पण अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली आहे. याचदरम्यान,आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अंतरवाली सराटीतून मोठी घोषणा केली आहे.
महाराष्ट्राचे 21 मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे गुरुवारी (ता.5) शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री आणि महायुतीतील काही मंत्र्यांचा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. यातच आता मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा दंड थोपटलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर स्थापन झाल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला होता. फडणवीस हे मराठा आरक्षणाचे विरोधक आहेत, अशी प्रतिमा विरोधकांकडून तयार करण्यात आली आहे. त्यामुळे हे आंदोलनही फडणवीस यांच्यासमोरचे मोठे आव्हान आहे.
जरांगे पाटील म्हणाले, अंतरवाली सराटीमध्ये सामूहिक आमरण उपोषण करण्यात येणार आहे. हे आंदोलन इतकं भव्य दिव्य असेल की, यापूर्वी असं सामूहिक बेमुदत उपोषण कोणीही बघितलं नसेल. असंच ते सामूहिक आमरण उपोषण होणार आहे. मात्र, आरक्षण घेतल्याशिवाय मी कोणालाही सोडणार नाही,असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकार सत्तास्थापन झाल्यानंतर आपण सामूहिक आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता.तसेच हे आंदोलन मरेपर्यंत सुरू राहील, हीच आंदोलनाची पुढची दिशा असल्याचंही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
तसेच देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा न द्यायला ते काही आमचे शत्रू नाहीत,त्यामुळे त्यांचे अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देखील देतो. महाराष्ट्रात आमची संस्कृती आहे. आम्ही विरोध पण करतो आणि मोठ्या मनाने शुभेच्छा देखील देतो, अशी भूमिकाही जरांगे पाटील यांनी मांडली आहे. याचवेळी मराठा समाजाला आरक्षण मिळल्याशिवाय सुट्टी नाही,असा इशारा देखील यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
देवेंद्र फडणवीस हे उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला तब्बल 22 राज्यातील मुख्यमंत्री, पाचशेहून अधिक संत- महंत देखील हजर राहणार आहेत.
मुंबई पोलिसांकडून अडीच हजारांहून अधिक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शपथविधी दरम्यान 10 पोलिस उपायुक्त, 20 सहाय्यक पोलिस आयुक्त, 100 पोलिस निरीक्षक, 150 सहाय्यक व पोलिस उपनिरीक्षकांसह 1500 हून अधिक पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित राहणार आहेत. सोबतीला सशस्र पोलिस दल, टास्क फोर्ससह इतर सुरक्षा यंत्रणा,ड्रोनद्वारेही पोलिसांचा शपथविधी सोहळ्यावर कडक वॉच असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.