Eknath Shinde, Anand Dighe, Naresh Mhaske Sarkarnama
मुंबई

Thane Lok Sabha Election Result : 'दिघेंचा खरा शिष्य कोण हे ठाणेकरांनी दाखवून दिलं' ; एकनाथ शिंदेंकडून नरेश म्हस्केंचं कौतुक!

Eknath Shinde on Naresh Mhaske Victory : डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला असून मागील १० वर्षात केलेल्या विकासकामांमुळेच त्यांना हा विजय मिळविता आला असल्याचेही ते म्हणाले.

Pankaj Rodekar

Maharashtra Loksabha Election Result : 'ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेम या ठाण्यावर होते. त्यामुळे या ठाण्यावर पुन्हा एकदा भगवा फडकला आहे. सर्व सामान्य कार्यकर्ता हा आज खासदार झाला आहे. तर आनंद दिघे यांचा खरा शिष्य कोण हे देखील ठाणेकरांनी आज दाखवून दिले आहे.' अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के यांच्या विजयावर प्रतिक्रिया देत त्यांचे कौतुक केले.

याचदरम्यान त्यांनी 'आम्ही नेहमीच विकासाचे राजकारण केले आहे आणि यापुढेही विकासाचाचे राजकारण करणार आहोत. परंतु काहींनी अप्रचार केला, संविधान बदलणार म्हणून प्रचार करुन संभ्रम निर्माण केला. परंतु जे अशा संभ्रमाला बळी पडले आता त्यांना त्यांचा(विरोधकांचा) खरा चेहरा दिसून येईल. परंतु आम्ही संभ्रम दूर करण्यात कमी पडलो, असेल तर आम्ही त्यांचा संभ्रम दूर करू. असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ठाणे लोकसभेचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के(Naresh Mhaske) हे विजयी झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी घोडबंदर रोड कावेसर येथील मतमोजणी केंद्रावर जाऊन म्हस्के यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संबोधताना त्यावरील पहिली प्रतिक्रिया दिली.

पुढे बोलताना, 'आम्ही या मतदारसंघात उमेदवार उशीराने घोषीत केले, त्यामुळे कुठेतरी त्याचा परिणाम मतांवर झाल्याचे सांगताना, मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत, काहींनी त्यांच्या विरोधात अप्रचार केला, मोदी हटावचा नारा दिला. मात्र जनेतेने त्यांना तडीपार केले असून इंडिया आघाडीचे सरकार येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.'

मागील दोन वर्षांत राज्याचा महायुतीने केलेला विकास आणि मागील १० वर्षात मोदी यांनी देशाचा केलेला विकास यामुळेच महायुतीला हे यश प्राप्त झाले आहे. तसेच ठाण्यातील जनेतेने देखील म्हस्के हेच बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेचा पहिला खासदार दिला असल्याचेही ते म्हणाले. तर कल्याणमध्येही डॉ. श्रीकांत शिंदे(Shrikant Shinde) यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला असून मागील १० वर्षात केलेल्या विकासकामांमुळेच त्यांना हा विजय मिळविता आला असल्याचेही ते म्हणाले.

कायम कार्यकर्ता म्हणून राहण्याचाच प्रयत्न करीन - नरेश म्हस्के

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या पाठीशी हात ठेवून माझ्यासारख्या सर्वसाधारण एक नगरसेवक म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला 12 दिवसांत खासदार बनवले आहे. मुख्यमंत्री शिंदे हे दिघे यांच्याप्रमाणे सर्वसामान्यांना न्याय देणारे आहेत. यावरून दिघे यांचा खरा शिष्य कोण हे जनतेने दाखवून दिले आहे. तसेच यापुढे मी कायम कार्यकर्ता म्हणून राहण्याचाच प्रयत्न करीन अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT