Thane Lok Sabha Result : ठाण्याची शिवसेना अन् शिंदेंचे ठाणे; नरेश म्हस्केंनी पत वाढवली!

Naresh Mhaske won Thane Lok Sabha Election : पहिल्या फेरी पासून शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली
Naresh Mhaske Thane Loksabha
Naresh Mhaske Thane LoksabhaSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Loksabha Election Result : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे लोकसभा मतदार संघ राखण्यात शिवसेना शिंदे गटाला यश आले आहे. नरेश म्हस्के यांच्या रूपाने ठाण्याला नवे खासदार मिळाले आहे. म्हस्के हे सुमारे लाखांच्या मताधिक्याने विजयी ठरले आहेत.

या निवडणुकीत ठाणे मतदारसंघातील मतदारांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला नाकारल्याचे पाहण्यास मिळाले. पहिल्या फेरी पासून शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के(Naresh Mhaske) यांनी घेतलेली आघाडी कायम ठेवली आहे. विजय खेचून आणण्यात त्यांना यश आले आहे.

Naresh Mhaske Thane Loksabha
Varsha Gaikwad Win : 3 तास झुंजल्या पण वर्षा गायकवाडांनी पंजा मारलाच!

शिवसेना फुटीनंतर शिवसेनेत दोन गट पडले. ही संधी साधून भाजपाने ठाणेदार होण्यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघावर दावा केला. याचदरम्यान शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये या मतदारसंघावरून जोरदार रस्सीखेच पाहण्यास मिळाली. पण, शिंदे यांनी हा मतदार आपल्याकडे खेचून आणत, थेट उमेदवाराची घोषणा केली.

Naresh Mhaske Thane Loksabha
Piyush Goyal : मुंबईत भाजपने थोडीतरी 'पत' राखली; उत्तर मुंबईत पीयूष गोयल 'विनर'

याचदरम्यान निष्ठावंत आणि गद्दार असे चित्र ठाण्यात निर्माण करण्यात आले. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची ही लढत असल्याने शिंदे यांनी आपल्या पठ्ठ्यासाठी चांगलीच कंबर कसली आणि पसरलेली नाराजी वेळीच दूर करण्यात यश आले

या मतदारसंघात एकूण 24 लाख 3 हजार 937 मतदार आहेत. यात 52.09 टक्के मतदान होऊन 13 लाख 6 हजार 194 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यात मंगळवारी सकाळी मतमोजणीस सुरवात होताच पहिल्या फेरीत नरेश म्हस्के यांना 3 हजार 210 मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी राजन विचारे यांना 2 हजार 597 मते मिळाली. यात पहिल्या फेरीत म्हस्के यांना 613 मतांची आघाडी प्राप्त झाली. यानंतर ही आघाडी पुढे पुढे वाढतच गेली.

Naresh Mhaske Thane Loksabha
South Central Mumbai Lok Sabha : दक्षिण मध्य मुंबईत मुख्यमंत्री, शिंदेंचे लाडके मागे पडले

दरम्यान सकाळी साडेअकराच्या सुमारास शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे(Rajan Vichare) हे मतमोजणी केंद्रावर दाखल झाले. त्यांनी काही वेळ मतमोजणी केंद्रावर आढावा घेतला. त्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के हे मतमोजणी केंद्रात दाखल झाले. तेव्हा त्यांच्यासोबत युवासेना कार्यध्यक्ष पूर्वेश सरनाईक आणि विजय चौघुले हे होते.तोपर्यंत नरेश म्हस्के यांची आघाडी 1 लाख 3 हजार पर्यंत पोहचली होती.

यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे मतमोजणी केंद्रातून बाहेर पडले. ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण मतमोजणीच्या 28 फेऱ्या पार पडल्या. तेव्हा म्हस्के यांनी सुमारे लाख मतांनी आघाडी घेतली होती. विजय निश्चित झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतमोजणी केंद्रावर जाऊन म्हस्के यांना शुभेच्छा दिल्या.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com