CM Eknath Shinde News  Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde: शिंदेंनी सांगितली व्याख्या; CM म्हणजे...

Maharashtra Politics : राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली.

Mangesh Mahale

Mumbai News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन वर्षाचे स्वागत रक्तदान करून केले. धर्मवीर आनंद दिघे यांनी 28 वर्षांपूर्वी 31 डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचा उपक्रम सुरू केला होता, तेव्हापासून दरवर्षी शिंदे 31 डिसेंबरला रक्तदान करतात. यंदाही त्यांनी ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराजै मैदानात ठाणे जिल्हा शिवसेना शाखेतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात शिवसैनिकांसोबत रक्तदान केले.

सर्वसामान्यांना न्याय मिळणे, हाच खरा राज्याचा विकास आहे. हे राज्य सुजलाम सुफलाम होवो. राज्यातील बळीराजावरील संकट दूर व्हावे, महाराष्ट्राची भरभराट व्हावी, राज्याला प्रगतीपथावर येण्यासाठी प्रयत्न करणार, असा संकल्प केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सीएम (CM) म्हणजे काय, याची व्याख्या शिंदेंनी सांगितली. या राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली आहे, एक कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय. CM म्हणजे चीफ मिनिस्टर नाही तर CM म्हणजे कॉमन मॅन, असे ते म्हणाले.

'नवीन वर्षात राज्यात चांगली कामे होत आहेत, मुंबईसह महाराष्ट्रमध्ये स्वच्छता अभियान सुरू केले आहे. त्याला नागरिकाचे मोठे सहकार्य मिळत आहे. 2014मध्ये नरेंद्र मोदींनी हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियान सुरू केले, त्यावेळी काही लोकांनी त्यांच्यावरती आरोप केले की, हे फोटोसेशन आहे, आता आमच्यावर हे टीका करीत आहेत. तुम्ही टीका करत राहा, मी माझ्या कामातून उत्तर देईन,' असा टोला शिंदेंनी विरोधकांना लगावला.

'मुख्यमंत्रिपदाच्या माझ्या दीड वर्षाचा कालावधीत जे निर्णय घेतले ते इतिहासामध्ये नोंद करण्यासारखे आहेत. सर्व निर्णय लोकहिताचे, जनतेच्या हिताचे आहेत. सरकार स्थापन होण्याआधी परदेशी गुंतवणुकीत मागे पडलो होतो, आमचं सरकार आल्यानंतर पुन्हा आपण पहिल्या क्रमांकावर आलो आहोत. येणाऱ्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे येणार असल्यामुळे लोकांच्या हाताला रोजगार मिळेल,' असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवारी आनंद दिघे यांचे स्वप्न होते की, अयोध्येत राम मंदिर व्हावे. त्यांचे स्वप्न पूर्ण होत आहे. बाळासाहेबांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना होत आहे, ही आनंदाची बाब आहे. शिवसेनाप्रमुख, धर्मवीरांचे स्वप्न पूर्ण होत आहेत, अशा भावना शिंदेंनी व्यक्त केल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT