Rahul Shewale Sarkarnama
मुंबई

Rahul shewale : पराभवानंतर राहुल शेवाळेंची पहिली प्रतिक्रिया, 'लोकशाहीत जनता...'

Rahul Shewale Vs Anil Desai : देसाई यांच्या विरोधातील लढाई ही एकतर्फी होणार नाही, असे वाटत होते. मनसेच्या मदतीने राहुल शेवाळे ही काटे की टक्कर देतील, अशी चर्चा होती.

Roshan More

Lok Sabha Election : दक्षिण-मध्य मुंबईत उद्धव ठाकरेंचे विश्वासू अनिल देसाई यांनी शिंदेंना साथ देणारे, दोन टर्म खासदार राहिलेल्या राहुल शेवाळे यांचा 53 हजार 384 मतांनी पराभव केला.शिवसेना भवनाच्या अंगणात झालेल्या लढाईत शिवसेना ठाकरेंचीच हे सिद्ध झाल्याचा कौल मुंबईकरांनी सहा पैकी चार जागा ठाकरेंच्या पदरात टाकून निकाल लावला.

देसाई Anil Desai यांच्या विरोधातील लढाई ही एकतर्फी होणार नाही, असे वाटत होते. मनसेच्या मदतीने राहुल शेवाळे ही काटे की टक्कर देतील, अशी चर्चा होती. मात्र, तब्बल 53 हजारांच्या लीडने विजय मिळवून देसाई यांनी ही लढत एकतर्फी केली.

पराभवानंतर राहुल शेवाळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'लोकशाहीत जनता ही सर्वोच्च असते. जनतेने दिलेला हा कौल मला मान्य आहे. जनतेच्या मताचा आदर करतो.या मतदासंघातील जनतेने दोन वेळा माझ्यावर विश्वास दाखवून मला त्यांची सेवा करण्याची जी संधी दिली, त्याबद्दल मी जनतेचा कायम ऋणी राहीन. यापुढे देखील जनतेची सेवा करत राहीन.', असे ट्विटरद्वारे दिली आहे.

अंतिम निकालात अनिल देसाई यांना 3 लाख 95 हजार मतं मिळाली तर राहुल शेवाळेंना 3 लाख 41 हजार 754 मतं मिळाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT