Shivsena Analysis : तुम्ही कितीबी करा रे हल्ला, लई मजबूत ठाकरेंचा किल्ला...

Lok Sabha Election 2024 Results : सत्ताधीशांनी कितीही हल्ला केला; तरीही ठाकरेंचा किल्ला शाबूत असल्याचे लोकसभा निवडणुकीच्या निकालाने विरोधकांच्या डोळ्यांत अंजन घातले.
Eknath Shinde, Uddhav Thackeray, Devendra Fadanvis
Eknath Shinde, Uddhav Thackeray, Devendra Fadanvis Sarkarnama

Maharashtra Election Results : आधी शिंदे, पुन्हा अजित पवार, त्यापाठोपाठ राज ठाकरे आणि त्यावरही उरल्या-सुरल्यांना साथीला घेऊन, ठाकरेंना पाडून काहीही करून मुंबई काबीज (बीएमसी) करण्याच्या विरोधी भाजपचा डाव मुंबईकरांनीच नुसताच उधळून लावला. म्हणजे, सत्ताधीशांनी कितीही हल्ला केला; तरीही ठाकरेंचा किल्ला शाबूत असल्याचे लोकसभा निवडणुकीच्या निकालाने विरोधकांच्या डोळ्यांत अंजन घातले.

हिंदुत्वाचा आवाज बुलंद करण्याच्या हिशेबाने बंड पुकारलेल्या शिंदेंना जवळ करून भाजपने विशेषतः केंद्रीय अमित शाह, आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पुढाकाराने सत्तांतर घडविले. त्यानंतर लोकसभेचा गणित मांडून ठाकरेंचे १३ खासदाराही 'महाशक्ती'ने ताकद दिली. अर्थात, या मंडळीनी ठाकरेंपासून फारकत घेतली.

तरीही, ठाकरे कोणाला ऐकणार नाहीत, याची जाण असलेल्या विरोध नेत्यांनी मुंबईतही ठाकरेंचे सैनिक फोडले. त्यात शंभरच्या घरात माजी नगरसेवक शिंदेंकडे वळले. त्यामुळे राज्यात, लोकसभेत आणि त्यापाठोपाठ मुंबई महापालिकेच्या सत्तेतूनही बेदखल करण्याचा शिंदे-फडणवीसांचा डाव राहिला.

शिंदेंची ताकद वाढत राहिल्याने ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) माजी नगरसेवकांनी मागचा-पुढचा विचार न करता नव्या शिवसेनेत प्रवेशाचा धडाका लावला. पुढच्या काळात राज ठाकरेंना 'मॅनेज' करून मुंबई महापालिकेतही शिंदेशाही आणण्याची नीती आखली. ठाकरेंच्या शिवसेनेची प्रचंड पडछड झाल्याने मुंबई महापालिका सहजरित्या हिसकावून घेता येईल, अशी अजूनही शिंदे-फडणवीसांना होती, त्यातूनच मुंबईची खडानखडा माहिती असलेल्या आशिष शेलारांकडे भाजपचे (Bjp) मुंबईची सूत्रे सोपवली.

Eknath Shinde, Uddhav Thackeray, Devendra Fadanvis
Beed Lok Sabha Election 2024 Result : बीडमध्ये 'पिपाणी'ने वाढवले, 'तुतारी'चे टेन्शन; वंचितपेक्षाही मिळाली अधिक मते

दुसरीकडे, खुद्द शिंदे हेच मुंबईत लक्ष घालत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंकडे हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकेही माजी नगरसेवक ठेवायचे नाहीत, असा चंग शिंदे-फडणवीसांनी बांधला. परंतु, लोकसभा निवडणुकीत मुंबईत ठाकरेंचे चारही उमेदवार जिंकले.

त्याचवेळी काँग्रेसच्या (congress ) वर्षा गायकवाडांच्या विजयातही ठाकरेंचा मोठा वाटा राहिला. त्यामुळे पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीने मुंबईकर हे ठाकरेंच्याच पारड्यात वजन अर्थात, निष्ठा टाकणार असल्याचे दिसून आले. त्यामुळेच, मुंबईत विरोधी नेत्यांनी कितीही हल्ला चढवला, तरीही ठाकरेंचा किल्ला मजबूत राहणार, हे समजण्यासाठी आता शिंदे-फडणवीसांनी कोण्या ज्योतिषाकडे जाण्याची गरज नसावी.

(Edited by : Sachin Waghmare)

Eknath Shinde, Uddhav Thackeray, Devendra Fadanvis
Shivsena Analysis: राज्यात ठाकरेंचा डंका..पण विश्वासू तीन साथीदारांना बसला दणका

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com