Maharashtra News : गोव्यात सध्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजपनं आपला दबदबा निर्माण केला आहे. या राज्यात भाजपनं सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज केली आहे. गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी फेब्रुवारी 2027 मध्ये निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांसाठी भाजपसह काँग्रेस, आप, मगोप आणि क्रांतिकारी गोवन्स हे प्रमुख पक्ष राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. यातच आता या निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचीही एन्ट्री होणार असल्याचं समोर आलं आहे.
माजी खासदार व एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर हे नेहमी त्यांच्या रोखठोक विधानांसाठी चर्चेत असतात. या त्यांच्या विधानांमुळे राजकीय वादही निर्माण झाले आहेत. पण आता याच कीर्तीकरांनी पुढच्या वर्षी सुरूवातीलाच होत असलेल्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचं जाहीर करुन टाकलं आहे.
गजानन कीर्तीकर म्हणाले, आमची शिवसेना आगामी गोवा विधानसभा निवडणूक लढवणार आहे. ही निवडणूक आम्ही फक्त लढवणारच नाही तर गोव्याचा पुढचा मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच होईल असा दावा कीर्तीकरांनी करत भाजपच्या गोटात खळबळ उडवून दिली आहे.यावेळी त्यांनी गोव्यात बाहेरचे लोक सत्ता गाजवत असून तेथील स्थानिक लोकांना नोकरी मिळत नाही, त्यांच्यावर अन्याय सुरू असल्याचा आरोपही कीर्तीकर यांनी केला आहे.
गोव्यामध्ये येत्या 2027 मध्ये निवडणुका होत आहे. याच धर्तीवर एकनाथ शिंदेंचे विश्वासू नेते गजानन कीर्तिकर यांनी मोठा दावा केला आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन गोव्यात शिवसेना स्थापन झाली आहे. त्याला आता एक वर्ष पूर्ण झालं असल्याचं म्हटलं आहे.
याच पार्श्वभूमीवर कीर्तीकर यांनी गोवा विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे. पण शिवसेनेचा गोव्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. लवकरच त्याबाबत शिवसेनेकडून निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.