Rohit Pawar on BJP morality Sarkarnama
मुंबई

Rohit Pawar on BJP morality : अंतुले, आबा, अजितदादांचा दाखला; एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांवरून रोहित पवारांनी भाजपला सुनावलं

Rohit Pawar Criticises BJP Morality Over Shiv Sena Ministers Sanjay Shirsat, Pratap Sarnaik, Sandipan Bhumre : एकनाथ शिंदे शिवसेना मंत्री संजय शिरसाट प्रताप सरनाईक संदिपान भुमरे यांच्या कारभारावरून भाजपच्या नैतिकतेवर आमदार रोहित पवार यांचा हल्लाबोल.

Pradeep Pendhare

Maharashtra politics BJP criticism : भाजपला नैतिकतेची आठवण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस आमदार रोहित पवार यांनी करून दिली आहे.

ही आठवण करून देताना महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री आणि खासदारांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला आहे. म्हणजेच, एकाच दगडात अनेकांवर रोहित पवारांनी निशाणा साधला आहे.

आमदार रोहित पवार यांनी समाज माध्यमांवर पोस्ट शेअर करत भाजपला (BJP) नैतिकचा डोस दिला आहे. यासाठी त्यांनी दिवंगत मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुलेसाहेब, आर. आर. पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दाखला दिला आहे.

रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "राज्यात बॅ. ए. आर. अंतुलेसाहेब यांच्यापासून, तर आर. आर. पाटील (आबा) यांच्यापर्यंत अनेक नेत्यांभोवती वेगवेगळ्या वादाचं मोहोळ निर्माण झालं होतं. त्यामध्ये आता सरकारमध्ये असलेल्या खुद्द अजितदादांचाही समावेश असून या सर्वांनीच त्या-त्या वेळी मंत्रिपदाचा त्याग केला. शिवाय ज्या ज्या वेळी भाजप विरोधात होती, त्या प्रत्येक वेळी त्यांनीही राजीनाम्यासाठी आकांडतांडव केलंच होतं. मग आज संदिपान भुमरे, संजय शिरसाठ, प्रताप सरनाईक हेच अपवाद का?, असा सवाल केला आहे".

'कायमच नैतिकतेच्या गप्पा हाणत, नाकाने कांदे सोलणाऱ्या भाजपकडून या नेत्यांना का पाठीशी घातलं जातंय? की या सर्वांना तुमच्या वॉशिंग मशिनमध्ये दुधाने आंघोळ करुन पवित्र संत-महात्मा केलं? तुमच्या नैतिकतेची हीच खरी परीक्षा असून या वादग्रस्त नेत्यांचे पहिले राजीनामे घ्या!', अशीही मागणी रोहित पवारांनी केली आहे.

महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट अन् प्रताप सरनाईक यांना वादानं घेरलं आहे. खासदार संदीपान भुमरे देखील अडचणीत आहेत. या तिघांवरून रोहित पवार यांनी महायुतीमधील भाजप व शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

एकनाथ शिंदेंच्या नेत्यांना इन्कम टॅक्सची नोटीस

एकनाथ शिंदेंना 'ईडी'ची नोटीस नाहीतर, इन्कम टॅक्सची नोटीस आल्याचं म्हणायचं होतं. कदाचित मी जर ईडी म्हटलं असेल, तर थोडं कन्फ्यूजन झालं. मात्र त्यांच्या अनेक नेत्यांना इन्कम टॅक्स नोटीस आलेले आहेत हे मात्र खरं आहे, असा दावा रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT