Narendra Patil police complaint : ‘मराठा’ असल्याचं भासवत महामंडळाची फसवणूक; नरेंद्र पाटलांची थेट पोलिस आयुक्तांकडे तक्रार

Nashik & Ahilyanagar Maratha Identity Fraud: 'मराठा' असल्याचे भासवत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या फसवणूक केल्याची तक्रार नरेंद्र पाटील यांनी नाशिक पोलिस आयुक्तांकडे केली.
Narendra Patil police complaint
Narendra Patil police complaintSarkarnama
Published on
Updated on

Nashik Ahilyanagar fraud news : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातील योजनांचा लाभ घेण्यासाठी मराठा असल्याचं भासवून आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

नाशिक आणि अहिल्यानगर इथं, असे प्रकार उघडकीस आले आहेत. आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी या प्रकारांची गंभीर दखल घेतली असून, नाशिक पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. याशिवाय राज्यातील सर्व कार्यालयांमध्ये, असे फसवणुकीचे प्रकार घडले आहेत का? याच्या चौकशीचा आदेश देखील नरेंद्र पाटील यांनी दिले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नरेंद्र पाटील यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळ मराठा समाजातील लाभार्थ्यांसाठी उभारण्यात आले आहे. आजपर्यंत दीड लाख लाभार्थ्यांनी 12 हजार 600 कोटींचा लाभ घेतला. त्यांना 1 हजार 222 कोटींचा व्याज परतावा मिळाला आहे. नाशिक विभागाचा विचार केला, तर 36 हजार 477 लाभार्थी इथं आहेत. त्यांना 2 हजार 798 कोटींचे कर्ज मिळाले असून, 253 कोटींचा व्याज परतावा देण्यात आल्याची माहिती दिली.

'महामंडळाकडून कर्ज मंजूर करून घेण्यासाठी धुळ्यातील काही कर्मचाऱ्यांनी आर्थिक मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात देखील घेतले. तसेच नाशिक (Nashik) व अहिल्यानगरमध्ये काही इतर समाजातील लोकांनी आपल्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात खाडाखोड करून या महामंडळाची फसवणूक केली आहे', अशी माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली.

Narendra Patil police complaint
BJP MP job fraud case : 'माझ्या मृत्यूस भाजप खासदार डॉ. के. सुधाकर जबाबदार'

नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना, फसवणूक केलेल्यांची नावे सांगण्यास नकार दिला. परंतु फसवणूक केलेल्यांची संपूर्ण माहिती पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांची भेट घेऊन दिल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

Narendra Patil police complaint
Rohit Pawar: '...तर एकनाथ शिंदे, अजित पवार यांना भाजपात विलीन होण्याशिवाय पर्याय नाही!'; रोहित पवारांचं मोठं विधान

राज्यात अशा स्वरूपाच्या घटना घडू नयेत यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने प्रकरणांची चौकशी करण्यात येईल. तालुकानिहाय लाभार्थ्यांची नावे जाहीर करण्यात येतील. यापुढे आधार लिंक बँक खात्यात थेट व्याजाची रक्कम परतावा देण्याची प्रणाली विकसित करण्याचे विचाराधीन असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

नरेंद्र पाटलांना, असा संशय

आमच्यासोबत सेल्फी किंवा फोटो काढून तो आपल्या सीएससी सेंटरमध्ये किंवा ई-सेवा केंद्रात लावतात. त्याचा वापर करून लाभार्थ्यांची फसवणूक होत आहे, असा संशय नरेंद्र पाटलांनी व्यक्त केला. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे संपूर्ण कामकाज ऑनलाइन स्वरूपात चालते. काही दलाल किंवा ऑनलाइन सेंटर चालक लाभार्थ्यांकडून पैसे उकळतात. कुणालाही एक रुपया देण्याची आवश्‍यकता नाही. फक्त अर्ज भरण्याची फी द्यावी, त्याव्यतिरिक्त एक रुपयाही लागत नसल्याचे नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com