Thane Shivsena : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नगरपंचायत निवडणुकीच्या काळात युती टिकवण्याची जबाबादरी माझ्यावर दोन तारखेपर्यंत आहे, असे म्हणत अप्रत्यक्ष एकनाथ शिंदेंना डिवचले होते. त्यामुळे दोन तारखेनंतर युती राहणार की नाही, अशी चर्चा सुरू होती. मात्र, नगरपंचायत निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी पत्रकार परिषद घेत रवींद्र चव्हाणांवर जहरी टीका केली.
ते म्हणाले, रवींद्र चव्हाणांना युतीवर बोलण्याचा अधिकार आहे का? बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी,लालकृष्ण अडवाणी यांच्या प्रखर हिंदुत्वावादी विचारातून आलेली ही अभेद्य युती आहे. मोदीजी, अमितजी शहा यांच्या बरोबर केलेली युती आहे. हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे. त्यावर बोलण्याची क्षमता रवींद्र चव्हाणांची आहे का? त्यांची पात्रता आहे का?
रवींद्र चव्हाण हे फूट पाडण्याचा काम करत आहेत. मालवण हे त्यांचं गाव आहे आणि डोंबिवली हा मतदारसंघ आहे. दोन्हीकडे ते आग लावण्याचे काम करत आहेत, असा टोला देखील कदम यांनी लगावला.
कदम म्हणाले, 'शिवसेनेतील दुसऱ्या फळीतील लोकं फोडण्याचे काम रवींद्र चव्हाण करत आहेत. त्यासाठी ते अमिष दाखवत आहेत, पैशाचे अमिष देत आहेत. एमएनसी देतो, महापौर देतो असं ते सांगत आहेत. एकनाथ शिंदेसाहेबांनी आम्हाला संयम पाळायला सांगितला आहे. आमच्या मागे देखील भाजपचे असंख्य पदाधिकारी आहेत.'
रवींद्र चव्हाण फक्त शिवसेना आणि इतर पक्षातील मुलं पळवत नाहीयेत तर ते कामं सुद्धा पळवत आहेत. खासदार श्रीकांत शिंदेसाहेबांच्या माध्यमातून होणारी कामं स्वतःच्या नावावर दाखवण्याचं काम मागील दोन आठवड्यापासून ते करत आहेत, असा दावा देखील कदम यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.