Mumbai News : महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये नाराजीनाट्य रंगल्याचे चित्र उभं राहिलं आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी पुन्हा इच्छुक आहेत. भाजपने तसा शब्द देखील होता, असे आता बोलले जाऊ लागले आहे.
संपूर्ण निवडणूक भाजप महायुतीने एकनाथ शिंदे यांचा चेहरा पुढं करत निवडणूक लढवली. भाजपने देखील मुख्यमंत्री पदावर दावा ठेवलाय. यातच शिवसेना प्रवक्त संजय शिरसाट यांनी मोठं विधान करत भाजपची धाकधूक वाढवली आहे.
भाजपने (BJP) एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाबाबत शब्द दिला होता, यावर संजय शिरसाट म्हणाले, "याबाबत मला काहीच कल्पना नाही. परंतु राजकारणात काही फिक्स नसते. मुख्यमंत्रीपदासाठी कोणाच्याही नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. जोपर्यंत नाव जाहीर होत नाही. तोपर्यंत काहीच सांगू शकत नाही. गेल्या पंधरा वर्षांपासून मंत्री म्हणून नाव चर्चेत आहे. परंतु झालो नाही. आता देखील मुख्यमंत्रीपदाबाबत काय चर्चा झाली आहे, हे मला सांगता येणार नाही". परंतु एकनाथ शिंदे कोणता निर्णय घेतील, हे शेवटच्या क्षणापर्यंत सांगू शकत नाही. हाच त्यांचा मोठा पाॅईंट आहे, असेही संजय शिरसाट यांनी म्हटले.
भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे राज्यात सत्ता स्थापनेचा वेग आला आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिला आहे. आता ते काळजीवाहू मुख्यमंत्री आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मौन रंगले आहे. यातच आता त्यांनी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेत भूमिका जाहीर करणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या भूमिकेबाबत उत्सुकता वाढली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय भूमिका मांडणार याच कल्पना नसली, तरी शिंदे शांत राहून करेक्ट कार्यक्रम करण्यात माहीर आहेत, असे देखील संजय शिरसाट यांनी म्हटले. या पत्रकार परिषदेला खासदार श्रीकांत शिदे, दादा भुसे, प्रताप सरनाईक, राजू वाघमारे, रवींद्र फाटक असे शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित आहेत.
भाजप महायुतीकडून शिवसेनाला उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, केंद्रीत मंत्रीपदाची देणार असल्याची चर्चा आहे. या सर्व चर्चा असून, त्याबाबत पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे हेच सांगतील, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांनी ही पत्रकार परिषद वर्षा या सरकारी निवासस्थानाऐवजी त्यांच्या ठाणे इथल्या निवासस्थानी घेत आहेत. त्यामुळे यावेळी शिंदे काय घोषणा करतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.