Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना अमित शाह यांचा फोन, नेमकं काय झाली चर्चा?

Eknath Shinde and Amit Shah discussion on Maharashtra politics: भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी फोन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महायुतीच्या सत्तास्थापनेचं घोडं मुख्यमंत्रीपदी कोण? यावर अडलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाला 72 तास उलटून देखील महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण? ठरत नसल्याने उत्सुकता ताणली गेली आहे. दोन दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शांत होते.

परंतु आज दुपारी त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. तत्पू्र्वी भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी त्यांचे फोनवरून बोलणे झाले आहे. त्यानंतर शिंदे यांनी लगेचच पत्रकार परिषदेचे आयोजन करत असल्याने वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

विधानसभा निवडणुकीला महायुतीला (Mahayuti) अभुतपूर्व यश मिळाले आहे. राज्यात भाजप महायुतीला 237 जागा जिंकल्या आहेत. या विजयासमोर महाविकास आघाडीचा धुव्वा उडला. महायुतीला मिळालेल्या यशानंतर आता सत्ता स्थापन लवकर होईल, असे वाटत असतानाच, मुख्यमंत्री पदावरून सर्व काही आडलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार, याची उत्सुकता आहे.

Eknath Shinde
Rohit Pawar : निवडणूक आयोगाच्या हलगर्जीपणावर पवारांचा निशाणा; आकडेवारीत तफावत आहे का?

भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव चर्चेत आहे. तर शिवसेना पक्षाकडून एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अजित पवार यांनी फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देऊन टाकला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्री पदाची रस्सीखेच चालू असल्याचे चित्र रंगले आहे.

Eknath Shinde
Top 10 News : 'CM'पदाचा चेहरा जाहीर करण्यास उशीर काय आहे कारण? ; पण 'काँग्रेस अभी जिंदा है!'- वाचा महत्त्वाच्या घडामोडी

यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांपासून शांत आहेत. फडणवीस देखील पुढं येत नाहीत. या सर्व घडामोडीवर राज्यातील सत्ता स्थापनेसाठी केंद्राला मध्यस्थी करावी लागणार असल्याचे चित्र निर्माण झाली आहे. यातच भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून चर्चा केली. या चर्चेनंतर लगेचच एकनाथ शिंदे यांनी दुपारी तीन वाजतात पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

शक्यतांवर चर्चा रंगलीय

अमित शाह यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या फोननंतर ते केंद्रात जाणार, अशी चर्चेला जोर धरला आहे. तसंच एकनाथ शिंदे यांना केंद्रात घेतल्यास, त्यांना राज्यात गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळणार, असे देखील शक्यता वर्तवली जात आहे. परंतु या सर्व चर्चा शिवसेनेने फेटळल्या आहेत. यानंतर सुरवातीला मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक असलेले शिवसेनेचे प्रवक्त्यांनी मवाळ भूमिका घेतली आहे. एकनाथ शिंदे यांची राजकीय भाषा स्पष्ट आणि सरळ आहे. त्यामुळे वेगळा, असा कोणताही निर्णय होणार नाही, असा दावा आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केला. अगोदर मुख्यमंत्री पद निश्चित होईल, त्यानंतर मंत्रिमंडळ ठरेल, अशी भूमिका महायुतीने घेतली आहे.

शिवसेना आमदारांची धाकधूक वाढली

मुंबईत थांबलेल्या सर्व शिवसेनेच्या आमदारांना एकनाथ शिंदेंनी आपपाल्या मतदारसंघात पाठवून दिले. मतदारसंघात विजयाचा जल्लोष साजरा करण्याचा आदेश एकनाथ शिंदे यांनी आमदारांना दिले आहेत. शिंदेच्या या भूमिकेमुळे आमदार देखील बुचकळ्यात पडले आहेत. यातच शिंदे यांनी पत्रकार परिषद घेणार असल्याने शिवसेनेच्या आमदारांची धाकधूक वाढली आहे. तसंच एकनाथ शिंदे यांच्या ठाणे इथल्या निवासस्थानी गर्दी वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com