Naresh Mhaske Sarkarnama
मुंबई

Shivsena Politics : शिंदेंच्या शिलेदाराच्या विधानानं बंडखोरीचे धुमारे; 'स्थानिक'साठी महायुती झाली तरी, 'एकला चलो रे'ची तयारी!

Eknath Shinde ShivSena Thane MP Naresh Mhaske Mahayuti local body elections : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत महायुती झाली तरी, पक्षांची एकला चलो रेची तयारी असेल, असे संकेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने दिले आहेत.

Pradeep Pendhare

Mumbai News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी होणार की, नाही होणार याकडे आता लक्ष लागले आहे. भाजप स्वबळाची घोषणा केलेली असतानाच, एकनाथ शिंदेंनी महायुतीतून 'स्थानिक'साठी समोरे जाणार, असे सांगत आहेत.

परंतु शिंदे यांच्या ठाण्यातील खासदार नरेश म्हस्के यांनी महायुतीत राहून 'एकला चलो रे'ची भूमिका राखून आहोत, असे विधान करत खळबळ उडवून दिली. 'स्थानिक'च्या निवडणुकीत महायुतीत बंडखोरीचे धुमारे अधिकच पेटताना दिसतील, असे दिसू लागले आहे.

महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीतील काही पक्षांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे. तशा घोषणा देखील केल्या आहेत. भाजप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, काँग्रेस पक्षाने मध्यंतरी स्वबळाची घोषणा केली होती. त्यावरून मित्रपक्षांकडून गदारोळ झाला होता.

महायुतीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाले आहे. त्यामुळे महायुतीमधील तिन्ही पक्ष स्थानिकसाठी स्वबळाची चाचपणी करत आहेत. भाजप सोडून शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाची जाहीरपणे, अशी घोषणा कोणी केलेली नाही. परंतु या दोन्ही पक्षांचा वेगळा प्लॅन असू शकतो, याची पूर्वकल्पना असल्याने भाजपने तशा रणनीती आखण्यास सुरवात केली आहे.

याच दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील खासदार नरेश म्हस्के यांनी जाहीरपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला समोरे कसे जायचे, याची रणनीती सांगून पक्षाची कोंडी करून घेतली आहे. महायुतीमध्ये राहून 'एकला चलो रे'ची तयारी ठेवावी, असे खासदार म्हस्के यांनी जाहीरपणे सांगून टाकले आहे. यामुळे महायुतीमधील भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस अलर्ट झाले आहे.

ठाण्यातील ऐरोलीतील कार्यक्रमात खासदार नरेश म्हस्के यांनी ही जाहीरपणे भूमिका मांडल्याने शिवसेनेची अडचण झाली आहे. यावेळी खासदार म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. ठाकरेंनी हिंदुत्व सोडले असून, काँग्रेसला आत्मसात केले असल्याचे म्हटले.

शिवसेनेच्या या रणनीतीमुळे भाजप अलर्ट झाली आहे. समान ताकदीच्या प्रभागांमध्ये महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. भाजपमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातून येणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्तांचे प्रवेश सुरू आहेत. त्यामुळे काही ठिकाणी महायुतीत तुल्यबळ लढतीचे संकेत मिळाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT