मुंबई - राज्यात शिवसेनेत दोन गट पडले आहेत. शिवसेनेला बंड हे नवीन नाही असे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात सांगितले होते. मात्र शिवसेनेच्या विरोधात पहिले बंड केले ते बंडू शिंगरे यांनी 1967 साली. शिवसेनेत पहिले बंड करणाऱ्या बंडू शिंगरे यांनी शिवसेनेतील आमदार व मंत्र्यांनी केलेल्या बंडावर आपले मत मांडले. ( Eknath Shinde should be the Chief Minister but should not support Fadanvis )
बंडू शिंगरे म्हणाले, शिवसेनेतील तेव्हाचे बंड व आताच्या बंडात फरक एवढाच होता की आम्ही निवडणूक लढविली नव्हती. ती शिवसेनेची सुरवात होती. 1967ची ती घटना आहे. त्यानंतर शिवसेना फोफावत गेली, मात्र आत्ता जसे एकनाथ शिंदेंना दाबण्यात आले तसे मला दाबले नसते तर शिवसेना महाराष्ट्राच्या घरात घरात पोचली असती. आता महाविकास आघाडी करण्याची गरज नव्हती. संपूर्ण शिवसेनामय महाराष्ट्र झाला असता, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावे मात्र देवेंद्र फडणवीस यांना साथ देऊ नये. कारण शिंदेंना माहिती नाही की, हे बोगस लोक आहेत. हे निवडून आलेले नाहीत. मतपत्रिकेने निवडणूक घेत नाहीत. मतदान यंत्राद्वारे निवडणूक घेतात. कारण त्यात बदमाशी करता येते, असे मत बंडू शिंगरे यांनी व्यक्त केले.
बंडू शिंगरे यांच्या बंडाचे कारण
मध्य मुंबई लोकसभा निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षातर्फे कॉम्रेड रोझा देशपांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्या कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या कन्या. मुंबईत त्यावेळी गिरणी कामगारांची चळवळ ऐन जोमात होती. या भागात शिवसेनेचीही ताकद चांगली होती. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी श्रीरामपूरमधील काँग्रेसचे नेते अॅड. रामराव आदिक यांना काँग्रेसचे तिकीट जाहीर केले. वसंतराव नाईक व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची चांगली मैत्री होती. आदिकही बाळासाहेब ठाकरे यांचे मित्र होते. त्यामुळे ठाकरेंनी शिवसेने उमेदवार दिला नाही. यातच बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवार न देण्यामागे सेटलमेंटचा आरोप होऊ लागला होता. त्यावेळी लालबागचे शिवसेना शाखा प्रमुख बंडू शिंगरे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला तिकीट मिळावे म्हणून बंड केले होते. त्यांनी प्रतीशिवसेना काढली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.