माझा लढा सर्व शिवसैनिकांच्या हितासाठी समर्पित : एकनाथ शिंदे

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे बंडखोरांविरुद्ध आक्रमक झाल्याने अनेक ठिकाणी संघर्ष
Eknath Shinde latest Marathi news
Eknath Shinde latest Marathi news sarkarnama

एकनाथ शिंदेंचे नवे ट्विट : 

प्रिय शिवसैनिकांनो, नीट समजून घ्या, म.वि.आ. चा खेळ ओळखा..! MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिता करीता समर्पित.... आपला एकनाथ संभाजी शिंदे.

चिमणराव पाटलांनी काय म्हटलयं?

बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या गटामार्फत रोज विविध आमदारांचे व्हिडीओ प्रसारित करण्यात येत आहे. आज सकाळी महेश शिंदे यांचा व्हिडीओ देण्यात आला. तर संध्याकाळी पारोळा मतदारसंघाचे (जि. जळगाव) आमदार चिमणराव आबासाहेब पाटील यांची भूमिका पुढे आणण्यात आली. त्यांनीही काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीवर शरसंधान केले. ते म्हणाले. ``आम्ही गेली 30 वर्ष प्रथम काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस सोबत संघर्ष करत आहोत. काँग्रेस - राष्ट्रवादी सोबत आमचा परंपरागत संघर्ष होता आणि यापुढेही राहील. आमच्या मतदारसंघात आमचे प्रमुख विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस, आमच्या पुढील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विरुद्धच लढाई आहे. या भूमिकेतूनच आम्ही सर्व आमदारांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांस विनंती केली कि नैसर्गिक युती व्हावी. पण त्यांच्याकडून दाद न मिळाल्याने आम्ही आमचे नेते एकनाथजी शिंदे यांस ही स्पष्ट भूमिका घेण्याचा आग्रह धरला.

नैसर्गिक युती व्हावी हि अखंड महाराष्ट्र मधील सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे. म्हणूनच विचारधारेसाठी केलेल्या या बंडाच्या भूमिकेला दोन तृतीयांश पेक्षा अधिक पक्षाचे आमदार आणि 10 सहयोगी अपक्ष आमदारांचे समर्थन आहे, असा दावा त्यांनी केला.

Shiv Sena MP Sanjay Raut Latest Marathi News
Shiv Sena MP Sanjay Raut Latest Marathi News Sarkarnama

महाराष्ट्रातील संघर्ष किती दिवस चालणार?

मुंबई : शिवसेनेतील बंडाळी आणि त्यानंतर महाविकास आघाडी सरकारसमोर आलेले संकट यामुळे सत्तासंघर्ष जोरात सुरू आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर देखील असेच सत्तानाट्य रंगले होते. त्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्यात 36 दिवसांचा कालावधी गेला होता. आता एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर हा संघर्ष आणखी किती दिवस चालणार, असा प्रश्न शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना विचारला असता त्यांनी 2019 चा रेकाॅर्ड मोडणार असल्याचा दावा केला.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. त्यामुळे आम्ही सत्ता राखू. समजा आम्ही अपयशी झालो तर होऊन होऊन काय होईल तर सत्ता जाईल. त्या सत्तेची आम्ही फिकीर करत नाही. हे सारे भजनलाल आहेत. हरियाणात भजनलाल यांनी काॅंग्रेसचे 40 आमदार फोडले होते. याचा अर्थ भजनलाल यांची संघटना काॅंग्रेस ठरली काय, असा सवाल त्यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरच शिवसेना चालते. त्यामुळे आमदार तिकडे गेले तरी सेनेला फरक पडणार नाही.

Shrikant Shinde
Shrikant ShindeSarkarnama

ठाणे : शिवसेनेतील बंडाळीनंतर ठाण्यात शिवसैनिक विरुद्ध एकनाथ शिंदे समर्थक यांच्यात वाद पेटला आहे. एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर हल्ला झाल्यानंतर त्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. प्रामाणिक शिवसैनिकांची माथी भडकविण्याचे काम सुरू आहे. हिम्मत असेल तर समोर या, असे आव्हान त्यांनी गाडीच्या बाॅनेटवर उभे राहून दिले. या वेळी मोठ्या संख्येने त्यांचे कार्य़कर्ते जमले होते. एकनाथ शिंदे यांच्या मागे 50 आमदारांचे बळ असल्याचाही दावा त्यांनी केला. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर हल्ला झाल्यानंतर त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. आम्ही भाई समर्थक, असे फलक घेतलेले अनेक कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी कशा प्रकारे कोरोना काळात काम केले, हे श्रीकांत यांनी आवर्जून सांगितले. एकूणच ठाण्यात आता शिंदे समर्थक शांत राहणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.  

Eknath Shinde Latest Marathi News, Rashmi Thackeray Latest Marathi News
Eknath Shinde Latest Marathi News, Rashmi Thackeray Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बंडखोर आमदारांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. त्यांना परत शिवसेनेत थारा नसल्याचे त्यांनी आज स्पष्ट केले. मात्र पडद्याच्या पाठीमागे उद्धव यांच्या पत्नी रश्मी या बंडखोरांची समजूत काढण्यासाठी रिंगणात उतरल्या आहेत. रश्मी या दूरध्वनीवरून बंडखोरांच्या कुटुंबियांशी बोलत आहेत. त्यांच्या या आवाहनाला हे बंडखोर कसा प्रतिसाद देणार, याची आता उत्सुकता आहे. रश्मी यांनी या आधी पण बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधला होता. शिंदे व बंडखोर आमदार सुरतमध्ये असतानाच रश्मी वहिनींशी ते बोलत होते. मात्र त्यातून फारसे सिद्ध झाले नाही. आता या काॅलचे काय परिणाम होणार, याबाबत साशंकताच आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com