Eknath Shinde Vs Uddhav Thackeray  sarkarnama
मुंबई

Eknath Shinde Speech : दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदेंचं तडाखेबंद भाषण; ठाकरेंवर केले 'हे' 10 गंभीर आरोप

Shivsena Dasra Melava 2024 : मोरू उठला, अंघोळ केली. अन् मोरू झोपला. आता तोच मोरू गल्लो गल्लीत फिरत आहे. दिल्लीत फिरत आहे. मला मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा म्हणून फिरत आहे. अरे बाबा तुमच्या सहकाऱ्यांना तुमचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून चालत नाही, मग राज्यातील जनतेला कसं चालेल अशा शब्दांत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंनी डिवचलं.

Deepak Kulkarni

Shivsena News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातून माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार शाब्दिक हल्ला चढविला.

ते म्हणाले, आपण उठाव केला नसता तर फक्त फेसबुक लाइव्हच झालं असतं.आपण फेसबुक लाइव्हवाले नाही, आपण फेस टू फेस काम करणारे लोक आहोत. बाळासाहेब म्हणायचे नेता घरात नाही, लोकांच्या दारात शोभून दिसतो. आपण ते शिकलो. करतो. पण नर्मदेचे गोटे कोरडेच राहिले असा खोचक टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) ठाकरेंना लगावला.

शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा शनिवारी (ता.12) मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला होता. या दसरा मेळाव्यातून शिंदेंनी ठाकरेंवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, महाराष्ट्राचं चित्र काय असतं.

मोरू उठला, अंघोळ केली. अन् मोरू झोपला. आता तोच मोरू गल्लो गल्लीत फिरत आहे. दिल्लीत फिरत आहे. मला मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा म्हणून फिरत आहे. अरे बाबा तुमच्या सहकाऱ्यांना तुमचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून चालत नाही, मग राज्यातील जनतेला कसं चालेल अशा शब्दांत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंनी डिवचलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणातील ठाकरेंवर ठळक मुद्दे :

* मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आनंद दिघे यांचा चेला आहे. मला हल्क्यात घेऊ नका.

* आज महाराष्ट्रात एकनाथ शिंदे जातो तिथे माझं स्वागत करतात आशिर्वाद देतात. हेच आपण कमावलं आहे.

* तुम्ही बंगल्यावर बंगले बांधा. पण धारावीकरांना खितपत ठेवण्याचं काम केलं आहे.

* काही लोकांना हिंदू शब्दाची लाज वाटते आहे. हिंदूहृदयसम्राट म्हणायला जीभ कतरत आहेत.

* बाळासाहेबांच्या विचाराशी बेईमानी करणाऱ्यांपासून आपण शिवसेना मुक्त केली.

* माझ्या दाढीवरून माझ्यावर टीका केली जाते. मात्र, याच दाढीवाल्याने महाविकास आघाडी उद्धवस्त केली.

* जे प्रकल्प रखडलेले आहेत. ते सर्व प्रकल्प आमचे सरकार पूर्ण करणार आहे

* महाविकास आघाडीचे काळे धंदे बंद झाले आहेत. त्यामुळे रोज आमच्यावर टीका करत आहे

* हरियाणाची पुनररावृती महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही.

* आम्ही फेसबूक लाईव्ह नाही, तर फेसटूफेस काम करणारे लोक आहेत.

* शिवसेना कोणाची आहे आपण लोकसभा निवडणुकीत दाखवून दिले. ते सहा जिंकले आपण सात जागा जिंकलो.

* आम्ही उठाव केला नसता, तर मोरू उठला असता आणि आंघोळ करून झोपला असता. आता हाच मोरू दिल्ली चकरा मारतो आहे.

* तुम्ही शिवसेनेचा भगवा रंग बदलण्याचा प्रयत्न केला. एमआयएम आणि उबाठा मध्ये आता फरक नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT