Shivsena UBT : सत्ता आल्यानंतर पहिलं 'हे' काम करणार, उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात जाहीर केलं

Shivsena UBT dasra melava : जसं आम्ही जय श्रीराम म्हणतो तसंच किंबहुना त्यापेक्षाही मोठ्या आवाजाने जय शिवराय म्हणणार. आम्ही प्रत्येक जिल्ह्यात जसं शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले
uddhav Thackeray
uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT : आम्हाला शिवाजी महाराज देवासारखेच आहेत. कोणी काही म्हणो आमची सत्ता आल्यानंतर पहिलं काम करणारे ते म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार. प्रभू रामचंद्रांनी जसे राक्षस मारले तसे माझ्या शिवाजी महाराजांनी अफजल खान सारखा राक्षस मारला. अफझल खान राक्षसच होता.

मी वचन देतोय प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार. जसं आम्ही जय श्रीराम म्हणतो तसंच किंबहुना त्यापेक्षाही मोठ्या आवाजाने जय शिवराय म्हणणार. आम्ही प्रत्येक जिल्ह्यात जसं शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार प्रत्येक राज्यात शिवाजी महाराजांचे मंदिर झालं पाहिजे.

उद्धव ठाकरे म्हणाले, मी कसा लढू. मी ज्यांना मोठं केलं ती माणसं माझ्यावर चालून येतायेत. कृष्णाने सांगितले शत्रू चालून येतो तेव्हा त्याच्याकडे बघू नको त्याला ठेचून काढा. कृष्णाने अर्जूनला सांगितलं पण महाराजांनी अंमलबजवणी केली.

uddhav Thackeray
Dasara Melawa News : हे सरकार पुन्हा डोक्यावर आलं तर मंत्रालयही गुजरातला नेतील!

महाराजांनी स्वराज्यवर येणाऱ्यांना ठेचून काढले. त्यात त्यांचे आप्तस्वकीय होते. आपलीच लोकं आली होती. पण महाराजांनी ते बघितलं नाही. स्वराज्यावर जो चालून येतो त्याचा शिरच्छेद केला. त्याच प्रमाणे राजकारण आपल्यावर चालून येतो त्यांचा राजकारणात शिरच्छेत केलाच पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.

अमित शाह तुमच्या दाढीला भुंगा लागलाय आणि डोक्यावर गुलाबी जाकीटवाली बोंडआळी लागलीये. आताचा भाजप हायब्रिड झालीये. इतर पक्षांचे नेते भाजपच्या गर्भात घुसलेत. भारतीय जनता पक्षात भारतीय म्हणायला लाज वाटली ‌पाहिजे, असे टोला देखील ठाकरेंनी लगावला.

uddhav Thackeray
Eknath Shinde : कट्टर शिवसैनिक मैदान सोडत नाही अन् विचारही; मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना डिवचले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com