Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

DCM Eknath Shinde : फडणवीस अन् अजितदादा दिल्लीत बिझी तर एकनाथ शिंदे पुढील 'मिशन'च्या तयारीलाही लागले!

Mahayuti Political Updates : जाणून घ्या, नेमकं काय आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पुढचं मिशन आणि मीडियासमोर त्यांनी नेमकं काय सांगितलं आहे?

Mayur Ratnaparkhe

Mumbai News: राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचे शपथिविधी झाले आहेत. मात्र अद्याप मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा मुहूर्त लागलेला नाही. महायुतीत मंत्रिपदावरून रस्सीखेच असल्याचंही बोललं जात आहे. तर हा मंत्रिपदाचा तिढा दिल्लीत सोडवल्या जाणार असल्याचे दिसत आहे. कारण, सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीत आहेत. मात्र दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र मुंबईतच आहेत.

विशेष म्हणजे या एकीकडे मंत्रिमंडळ विस्ताराची, खातेवाटपाची आणि शपथविधीच्या तारखेची लगबग सुरू असताना दुसरीकडे मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुढील मिशनही ठरल्याचं दिसत आहे. मुंबई महापालिकेवर पुन्हा भगवा फडकवण्यासाठी आणि महायुतीची सत्ता महापालिकेवरही आणण्यासाठी एकनाथ शिंदेंनी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.

कालही अशाच एका बैठकीनंतर मीडियाशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, आताच झालेल्या निवडणुकीत महायुतीला महाविजय मिळाला त्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी अभिनंदन केलं अन् शुभेच्छा दिल्या. आता मुंबई महापालिका निवडणूक देखील महायुतीच (Mahayuti) जिंकेल. त्या तयारीला सुरुवात झाली आहे.

तसेच, मुंबईत अडीच वर्षात जे काम केलं. खड्डे मुक्त मुंबई, आरोग्य असे सगळं डीप क्लीन ड्राईव्ह, बाळासाहेब दवाखाना, पालिकेत सुरू केलेल्या योजना हे सगळं केलेले निर्णय तसेच बंद पडलेले प्रकल्प सुरू करणं, मुंबई महापालिकेच्या माध्यमातून जी काम झाली नाही ती अडीच वर्षात आम्ही निर्णय घेतले. असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

याशिवाय 'महालक्ष्मी रेसकोर्सवर सेंट्रल पार्क करण्याचा निर्णय घेतला. मुंबई आर्थिक राजधानी आहे. पण मुंबई देशाचं पॉवर हाऊस झालं पाहिजे. त्यासाठी मुंबई पालिकेत सुद्धा महायुतीचे सरकार असणं आवश्यक आहे. त्या तयारीसाठी नगरसेवक, आमदार, खासदार यांची बैठक घेतली आणि यात चर्चा करण्यात आली. अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.

याचबरोबर 'महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी बैठक घेतली. विधानसभेच्या निवडणुकीत कामाची पोचपावती मिळाली. त्या कामावर लोक लक्षात ठेव पालिकेत महायुतीला विजय मिळेल. महायुती म्हणून 227 वॉर्ड मध्ये आम्ही तयारी करणार आहोत.

मुंबईचा विकास कारण हा आमचा अजेंडा आहे. मुंबई मध्ये गेले अनेक वर्ष खड्डे त्याचा प्रवास हे टाळण्यासाठी दोन फेज मध्ये आम्ही निर्णय घेतला. मेट्रोची, कोस्टल, अटल सेतू ही कामं लोक पाहत आहे. सुरक्षित मुंबई महिलांना द्यायची आहे. त्यासाठी ही निवडणूक लढवू .' असंही एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितलं.

तसेच पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी सुद्धा सांगितलं, मुंबईला आर्थिक कमतरता भासणार नाही. ते(विरोधक) लोकसभेच्या निवडणूक झाल्यावर इतके हुरळून गेले की त्यांनी निकालाआधीच विधानसभेचे मंत्रिमंडळ सुद्धा तयार केलं आणि मग मुंगेरी लाल के हसीन सपने कसे असतात ते पाहायला मिळालं. विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत.

आमच्या वैचारिक भूमिका आमच्या युतीत एक आहे. 2022 मध्ये आम्ही निर्णय घेतला आणि सर्व सामान्यांच्या सरकार आलं. काही जागा आमच्या किरकोळ फरकाने पडल्या. जो मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला त्याला मुंबईत आणण्याचं काम आपलं सरकार करणार आहे. असं शेवटी एकनाथ शिदेंनी स्पष्ट केलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT