डोंबिवली : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेनेदेखील शिंदे आणि बंडोखोराविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) मेळाव्यांमध्ये बंडखोराविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. या पार्शवभूमीवर आज (ता. २७ जून) एकनाथ शिंदे समर्थकांनी डोंबिवली घार्डा सर्कल येथे संजय राऊत यांचा पुतळा जाळून त्यांचा निषेध नोंदवला. या वेळी शिंदे समर्थकांनी राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. (Eknath Shinde supporters burnt the statue of Sanjay Raut in Dombivali)
शिवसेनेतील बंडानंतर राज्यात शिवसैनिकांकडून ठिकठिकाणी तोडफोड करण्यात येत आहे. आक्रमक शिवसैनिकांमुळे बंडखोर नेत्यांनीही आपल्या कुटुंबांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. तसेच, केंद्रीय गृह सचिवालाही त्यांनी कळविले होते, त्यानंतर केंद्र सरकारने बंडखोर नेत्यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्यात आली आहे.
एकीकडे, कायदेशीर लढाई सुरू असताना राज्यात रस्त्यावरील लढाईही सुरू आहे. शिवसेना नेत्यांकडून बंडखोरांना थेट इशारे दिले जात आहेत, त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या दोन दिवसांपासून संजय राऊत हे रस्त्यावर लढाई लढण्यासाठी तयार आहोत, असं सांगत आहेत. याशिवाय आदित्य ठाकरे, आमदार सचिन अहीर यांनीही बंडखोर आमदारांना विधानसभेत फ्लोअर टेस्ट देण्यापूर्वी रस्त्यावरची टेस्ट द्यावे लागेल, असा इशारा या नेत्यांनी दिला आहे.
दरम्यान, शिवसेना नेत्यांना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांकडून उत्तर देण्यास सुरुवात झाली आहे. शिंदे समर्थकांनी आज डोंबिवलीत संजय राऊत यांचा निषेध करत त्यांचा पुतळा जाळला आहे. ‘राऊतसाहेब आम्ही पण तयार आहोत. रस्त्यावर उतरून लढाई करून दाखवा’ असे आव्हान शिंदे समर्थकांनी केले आहे. राऊत यांनी स्वतः किती नगरसेवक, आमदार, खासदार निवडून आणले आहेत, असा प्रश्न शिंदे समर्थकांनी करत इथून पुढे शिंदे यांच्याविरोधात अपशब्द काढला, तर आम्ही सहन करणार नाही, असा इशारा या वेळी शिंदे समर्थकांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.