एकनाथ शिंदेंसह बंडखोरांच्या अडचणी वाढल्या; उच्च न्यायालयात याचिका दाखल

या बंडखोरांकडून आपले कर्तव्य पार पाडले जात नाही, त्यांनी घटनेने दिलेले कर्तव्य पार पाडावे, यासाठी आदेश द्यावेत, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या सोबत असलेल्या इतर आमदारांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या बंडखोरांकडून आपले कर्तव्य पार पाडले जात नाही, त्यांनी घटनेने दिलेले कर्तव्य पार पाडावे, यासाठी आदेश द्यावेत, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. (Public interest litigation filed in Mumbai High Court against Eknath Shinde and MLAs)

उत्पल बाबुराव चंदवार आणि इतर लोकांनी या बंडखोरांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. विशेष म्हणजे या याचिकेद्वारे या बंडखोरांनी आपले कर्तव्य निभावण्यासाठी परत येण्याबाबत मागणी करण्यात आलेली आहे.

Eknath Shinde
maharashtra political crisis : ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला

चंदवार यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर सहकाऱ्यांकडून आपले कर्तव्य पार पाडले जात नसल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने या सर्वांना कामावर परत येण्यासाठी निर्देश द्यावेत, अशी याचिकेत मागणी करण्यात आली आहे.

Eknath Shinde
राऊत शिंदे गटात जाणार..ठरली केवळ अफवाच ; म्हणाले, मी शिवसेनेतच..

दरम्यान, एकनाथ शिंदे गटानेही विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पाठवलेल्या निलंबनाच्या नाेटिशीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेने त्यांची विधानसभेतील गटनेतेपदावरून तातडीने हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागी मुंबईतील आमदार अजय चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. त्याला विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवळ यांनी मान्यता दिली आहे. त्याविरोधात शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. या दोन्ही विषयावर सर्वोच्च न्यायालयात थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com