मुंबई : महाराष्ट्राचे ३० वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शपथ घेतली. राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. याच बरोबर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाचा त्यांनी उल्लेख केला. त्यानंतर त्यांनी ईश्वरसाक्ष शपथ घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पदाची थपथ घेतली. इतर मंत्र्यांचा शपथविधी नंतर होणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये धक्यावर धक्के पाह्यला मिळत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. शिंदे यांचा राजकीय प्रवास थक्क करणार आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिंदे यांनी शिवसेनेकडून बंड केले. त्यावेळी त्यांच्यावर अनेकांनी टिकास्त्र सोडले. शिंदे यांना मुख्यमंत्री करत भाजपने मास्टर स्ट्रोक खेळला. फडणवीस यांच्या या खेळीमुळे महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे.
ठाकरे सरकारला वेठीस धरणारे शिंदे म्हणजे, कडवट शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे खंदे कार्यकर्ते. आनंद दिघेंसोबत आपला राजकीय प्रवास सुरु करणारे शिंदे गेली अनेक वर्षे शिवसेनेसोबत सक्रिय राजकारणात आहेत. आनंद दिघेंनंतर ठाण्यात शिवसेना वाढवण्याचे काम शिंदे यांनी एकहाती केले. एक रिक्षाचालकाने आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.