Eknath Shinde : ठाकरे, ना फडणवीस, विठ्ठलाच्या महापुजेला `एकनाथ` जाणार

फडणवीस मुख्यमंत्री तर शिंदे उपमुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले. पण धक्कातंत्राचा वापर करत फडणवीस यांनी स्वतः मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. (Bjp)
Chief Minster Eknath Shinde, Maharashtra News
Chief Minster Eknath Shinde, Maharashtra NewsSarkarnama

औरंगाबाद : शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत २५ आमदारांसह गुजरातमधील सुरत गाठले आणि राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. ध्यानीमनी नसतांना झालेल्या या बंडाने महाविकास आघाडी सरकार आणि ठाकरेंची झोप उडाली. (Eknath Shinde)एकनाथ शिंदे यांच्या बंडाला रोज पाठिंबा वाढत होता, मंत्री आमदारांची अक्षरशा रांग आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीच्या दिशेने लागली होती. ठाकरे सरकार जाणार, फडणवीस सरकार येणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या.

सोशल मिडियावर देखील या सत्ता नाट्यानंतर आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार की मग देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यावर दोघांच्याही समर्थकांकडून दावे प्रतिदावे केले जात होते. ही चर्चा इतकी रंगली त्यानंतर यावरून मिम्स तयार करून ते देखील व्हायरल केले जाऊ लागले. (Maharashtra) यातील एक मिम्स चांगेलच चर्चेत आले होते, ते म्हणजे विठ्ठल, म्हणजे साक्षात पांडुरंग देखील विचारात पडले की माझी महापूजा कोण करणार?

अखेर या मिम्स आणि सोशल मिडियावरील चर्चेला आता पुर्णविराम मिळाला आहे. ना उद्धव ठाकरे ना देवेंद्र फडणवीस, पंढरपुरातील विठ्ठलाच्या महापुजेचा मान मिळाला तो राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना. विठ्ठलाच्या दर्शनाला एकनाथच जाणार हे आता स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपुर्वी देहूमध्ये आले होते. ते दिल्लीला परतले आणि राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले.

त्यानंतर देखील सोशल मिडियावर मिम्सचा पाऊस पडला होता. डोक्यावर वारकऱ्यांची पगडी घातलेले मोदी शिवसेनेच्या एकनाथाला घेऊन जात आहे, असे असंख्य फोटो सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आले होते. त्यानंतर घडलेल्या वेगवान घडामोडी, सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांनी दिलेले बहुमत चाचणीचे निर्देश कायम ठेवल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासह विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामाही दिला.

Chief Minster Eknath Shinde, Maharashtra News
Bjp : औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराचे श्रेय देखील फडणवीसांनी ठाकरेंना मिळू दिले नाही...

नवे सरकार स्थापन होऊन फडणवीस मुख्यमंत्री तर शिंदे उपमुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले. पण धक्कातंत्राचा वापर करत फडणवीस यांनी स्वतः मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे पहाटेच्या शपथविधी सारखाच पुन्हा महाराष्ट्रातील जनतेला धक्का बसला. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून सोशल मिडिया आणि शिवसेना-भाजपच्या समर्थकांकडून विचारला जाणारा आषाढीला विठ्ठलाचा महापूजा कोण करणार? हा प्रश्न निकाली निघाला आहे. ठाकरे ना फडणवीस, विठ्ठलाच्या भेटीला एकनाथच जाणार हे आता स्पष्ट झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com