Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : मनसैनिकांनी गाडीवर शेण अन् बांगड्या फेकल्या, CM शिंदेंनी ठाकरेंना दोनच शब्दांत डिवचलं

Akshay Sabale

बीडमध्ये शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) पदाधिकाऱ्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्याचे पडसाद शनिवारी ( 10 ऑगस्ट ) ठाण्यात उमटले. शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसैनिकांनी शेण, बांगड्या फेकल्या.

यानंतर शिवसैनिक-मनसैनिक आमने-सामने आले. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'अ‍ॅक्शनला-रिअ‍ॅक्शन' मिळते म्हणत ठाकरेंना ( Uddhav Thackeray ) डिवचलं आहे.

एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) म्हणाले, "राज ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यात ठाकरे गटानं याची सुरूवात केली. ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा नाही. दगडफेक करणं, सुपाऱ्या टाकणं हे कुणालाही आवडलं नाही. शेवटी 'अ‍ॅक्शनला-रिअ‍ॅक्शन' मिळते. पण, याचं कुठलंही समर्थन करणार नाही."

"आम्ही सत्तेत आल्यापासून हे 'सरकार घटनाबाह्य आहे', 'एक महिन्यात पडणार' असं बोललं जातं. दोनवर्षे झाली, सरकार अधिकाधिक मजबूत होत गेले. कारण, आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार सोडले नाहीत. त्यामुळे लोक आमच्यासोबत येत आहे. ज्यांनी विचार सोडले, त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. म्हणून आपले ध्येय, विचार ठरवले पाहिजे. सत्तेसाठी कुठलीही तडतोड आम्ही केली नाही," असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

"धनुष्यबाण वाचविण्यासाठी आम्ही बंड करण्याचा निर्णय घेतला. आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना पक्ष भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकावर होता. लोकसभेला 'स्ट्राइक रेट' पाहिला, तर लोकांनी पसंती आणि मान्यता कुणाला दिली, हे सांगण्याची आवश्यकता नाही," अशी कोपरखळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटाला मारली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT