Video Sanjay Raut : ठाकरे दिल्लीला का गेले होते? राऊतांनी केली शिंदे गट अन् भाजपला गाडायची भाषा

Sanjay Raut On Bjp Shinde Group : "दिल्ली कालपर्यंत देशाची राजधानी होती. आता ती गुजरातची झालेली आहे. पण...", असा हल्लाबोलही संजय राऊतांनी केला.
sanjay raut |eknath shinde | devendra fadnavis | ajit pawar
sanjay raut |eknath shinde | devendra fadnavis | ajit pawarsarkarnama
Published on
Updated on

शिवसेनेचे ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली दौरा केला. त्यावेळी त्यांनी सर्व काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यावर शिंदे गट आणि भाजपने टीकची झोड उठवली होती.

ठाकरे दिल्लीला कशाला गेले, असा प्रश्न उपस्थित करत ते काँग्रेसपुढे नतमस्तक झाले, असा हल्लाबोलही करण्यात आला. त्याला उत्तर देताना खासदार संजय राऊतांनी, "तुम्हाला गाडायला ठाकरे ( Uddhav Thackeray ) दिल्लीला गेले होते," असे सांगितले.

संजय राऊत ( Sanjay Raut ) ठाण्यातील 'भगवा सप्ताहाच्या' कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी दिल्लीतील दौऱ्याबाबत माहिती दिली. संजय राऊत म्हणाले, "उद्धव ठाकरे दिल्लात गेले, त्यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. आघाडीतील नेत्यांनी त्यांच्यासाठी 'रेडकार्पेट' टाकले होते. काहीजण विचारतात की, 'उद्धव ठाकरे दिल्लीत कशाला गेले होते?' तुम्हाला गाडायला गेलो होते दिल्लीत... आम्हाला दिल्ली काय आहे माहिती आहे. मात्र, लायकी नसताना तुमच्या पोराबाळांना दिल्लीत पाठवायचे काम उद्धव ठाकरेंनी केले, हे विसरू नये."

sanjay raut |eknath shinde | devendra fadnavis | ajit pawar
Uddhav Thackeray News : '..तर मिंधेंची दाढी उगवलीच नसती' ; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातूनच एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!

"दिल्ली कालपर्यंत देशाची राजधानी होती. आता ती गुजरातची झालेली आहे. पण, हा 'गुजरात पॅटर्न' नष्ट करून दिल्लीला पुन्हा एकदा देशाची राजधानी बनवायची आहे. जेव्हा जेव्हा हिमालय संकटात सापडला, तेव्हा तेव्हा सह्याद्री त्याच्या मदतीसाठी गेला आहे. सध्या देशावर हुकूमशाहीचे संकट आहे. ते संकट दूर करण्यासाठीच उद्धव ठकारे दिल्लीला गेले होते. ठाकरे दिल्लीत गेले, त्यावेळी अहमद शाह अब्दाली घाबरून घरातच बसला होता. कुणी बाहेर पडले नाही," असा टोला संजय राऊतांनी अमित शाह यांचा उल्लेख न करता लगावला.

sanjay raut |eknath shinde | devendra fadnavis | ajit pawar
Sanjay Raut : उद्धव ठाकरेच महाराष्ट्राचा चेहरा; संजय राऊतांच्या घोषणेने आघाडीत बिघाडी होणार?

"पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला विश्वगुरू म्हणवतात. मात्र, ऑलिंपिकमध्ये आपल्या कुस्तीपटूचे पदक काढून घेतले गेले. त्यासाठी या विश्वगुरूंचा आवाज आलेला नाही. देशातील 117 खेळाडूंचे पथक ऑलिंपिकसाठी पॅरेसला गेले आहेत. यात गुजरातचे फक्त दोनच आहेत. पण, खेळावरील सर्वात जास्त निधी 469 कोटी रुपये गुजरातला दिला आहे. खेळात आणि सैन्यात गुजरात नाही. देशाचे संरक्षण करणे, देशासाठी बलिदान देणे हे महाराष्ट्राचे काम आहे आणि तो आम्ही करणार," असेही राऊतांनी ठणकावून सांगितले.


( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com