Eknath Shinde, Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray Vs Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात 'इंजिन' धडकणार; मनसे लढवणार लोकसभेच्या तीन जागा ?

MNS Enters In Thane For Lok Sabha : महायुतीसह महाविकास आघाडीलाही राज ठाकरेंची धास्ती

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : काही महिन्यांवर आलेल्या लोकसभेसाठी महायुतीसह महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी मनसेनेही कंबर कसली असून ठाण्यातील तीन आणि पालघरमधील एक अशा चार जागा लढवण्याची घोषणा मनसेने केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातच मनसे दंड थोपाटणार असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापणार आहे. (Latest Political News)

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे (Raj Thackeray) आक्रमक झाले आहेत. यांच्याकडून भाजप, शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट, राष्ट्रवादी अशा सर्वांनाच लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे मनसे स्वबळाचा नारा देत रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. आता ठाणे आणि पालघरमधील लोकसभेच्या चारही जागा लढणार असल्याची घोषणा मनसेने केली आहे. यामुळे इतर पक्षाकडून काय भूमिका घेतली जाणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. विशेषतः त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यातील ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडीची निवड केल्याने याठिकाणी शिंदे गटासमोर मनसे आव्हान असणार आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज ठाकरे ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमधील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. राज ठाकरेंनी ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, पालघर या चार लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. ठाणे आणि पालघरमधील लोकसभेच्या चारही जागा लढणार असल्याची घोषणा अविनाश जाधव यांनी केली आहे. या चारही लोकसभा मतदारसंघातील आढावा घेण्यात आला असून तुल्यबळ उमेदवार देणार असल्याचेही जाधवांनी स्पष्ट केले आहे.

मनसेकडून पुढील काळात प्रत्येक मतदार संघातील ७० हजारपेक्षा जास्त घरांमध्ये कशा पद्धतीने पोहोचता येईल? यावर रणनीती ठरविण्यात आल्याची माहिती यावेळी जाधवांनी दिली. दरम्यान, युवा तरुणांचा मोठ्या प्रमाणात मनसेमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या या निर्णयामुळे महायुती व महाविकास आघाडीने चांगलीच धास्ती घेतली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT