NCP Sharad Pawar leader Chandrakant Patil joins Eknath Shinde’s Shiv Sena in Navi Mumbai, sparking a fresh political twist. sarkarnama
मुंबई

Eknath Shinde Politics : एकनाथ शिंदेंचे एका बाणातून दोन निशाण : नवी मुंबई महापालिका अन् मुंबई बाजार समितीही टप्प्यात

Eknath Shinde Vs Sharad Pawar Chandrakant Patil : आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला.

Roshan More

Eknath Shinde News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका बाणातून 2 निशाण साधत नवी मुंबईच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशाने शिंदे यांनी नवी मुंबई महापालिका आणि नवी मुंबई बाजार समिती टप्प्यात आणली आहे.

चंद्रकांत पाटील आणि त्यांचा मुलगा विनीत पाटील यांनी सोमवारी (29 सप्टेंबर) एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना उपनेते विजय चौगुले हेदेखील उपस्थित होते. आगामी नवी मुंबई महापालिका आणि मुंबई बाजार समितीवर वर्चस्व ठेवण्यासाठी हा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जातो.

चंद्रकांत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते. शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी पदमुक्त करण्याची विनंती केली होती. मात्र शिंदे यांनी पाटील यांच्याकडेच जबाबदारी कायम ठेवली होती. नवी मुंबई महापालिकेतही पाटील यांची मोठी ताकद आहे. ते स्वतः माजी नगरसेवक राहिलेले आहेत.

याशिवाय चंद्रकांत पाटील हे प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक माथाडी युनियमध्ये पूर्वीपासून सक्रीय आहेत. कामगार वर्गात त्यांचा चांगला संपर्क आहे. भूमिपूत्र देखील त्यांच्याशी जोडले गेले आहेत. त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशाने मुंबई बाजार समितीवरही वर्चस्व ठेवणे शिवसेनेला सोपे जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT