Eknath Shinde and Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : मुख्यमंत्री शिंदेंची 'मास्टर' खेळी; ठाकरेंच्या ताब्यातील 'या' संघटनेबाबत मोठा निर्णय

Eknath Shinde Big Decision : जर ही संघटना शिंदेंना आपल्याकडे वळवण्यात यश आले तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का असणार आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : लोकसभा निवडणुकीतील अनपेक्षित निकालानंतर महायुती चांगलीच बॅकफूटवर गेली आहे. भाजपसह मित्रपक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आत्तापासूनच विधानसभेची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी मेळावे,बैठका यांचा धडाका लावला आहे. लोकसभेतील दारुण पराभवानंतर महायुती खडबडून जागी झाली आहे. अशातच आता उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के दिल्यानंतर आता पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मास्टर खेळी खेळण्याच्या उद्देशाने नवा डाव टाकला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वर्चस्व असलेल्या मुंबई विमानतळ नागरी कर्मचारी संघटनेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.त्यात मुख्यमंत्री शिंदेंनी या संघटनेतील कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ केली आहे. हा ठाकरेंच्या ताब्यात असलेली मुंबई विमानतळ नागरी कर्मचारी संघटना आपल्याकडे वळविण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. जर ही संघटना शिंदेंना आपल्याकडे वळवण्यात यश आले तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का असणार आहे.

सध्या मुंबई विमानतळावरील भारतीय कामगार सेना या संघटनेवर उद्धव ठाकरे गटाचे दबदबा आहे.महाविकास आघाडी सरकार पाडून महायुती सत्तेत आल्यानंतर सुध्दा उद्धव ठाकरेंना या संघटनेवर वर्चस्व राखण्यात यश आले आहे. आता मात्र,या संघटनेला आपल्याकडे ओढण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले असल्याची चर्चा आहे. या संघटनेच्या कर्मचाऱ्यांचा पगार दुप्पट केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयाचा मुंबई विमानतळावरील या भारतीय कामगार संघटनेतील घटक असलेल्या सफाई कामगार, चालक,कार्गो लोडर आणि लिफ्ट ऑपरेटर यांना होणार आहे. या आधी या कामगारांचा पगार 4 हजार होता पण आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर त्यांचे मानधन 8 हजार 600 इतके होणार आहे.

आता भारतीय कामगार संघटनेच्या कर्मचाऱ्यांना आता प्रत्येकी 5 हजार 800 रूपयांचा वाढीव भत्ता,तसेच 2 हजार 800 चा डीअरन्स अलाऊन्स यांसह एकूण 8600 रुपये पगार दिला जाणार आहे.पाच लाखांचा आरोग्य विम्यासह अनेक सरकारी योजनांचा लाभही त्यांना मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT