Nana Patole Disagreement : विधान परिषद निवडणुकीत ठाकरे-काँग्रेसमध्ये पुन्हा खडाखडी; दोन उमेदवार मागे घेण्याचा पटोलेंचा ठाकरेंना सांगावा

Mahavikas Aghadi nana patole and uddhav thackeray disagreement vidhansabha Election : ठाकरे उमेदवारी मागे घेणार की सांगलीचा पुढचा डाव विधान परिषदेत बघायला मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Nana Patole-Uddhav Thackeray
Nana Patole-Uddhav ThackeraySarkarnama

Mumbai, 11 June : विधान परिषदेच्या जागांवरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात पुन्हा खडाखडी सुरू झाली आहे. शिवसेनेने चारही जागांवर उमेदवारी जाहीर केली आहेत, त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त करत दोन उमेदवार मागे घेण्याची विनंती केली आहे. आता ठाकरे उमेदवारी मागे घेणार की सांगलीचा पुढचा डाव विधान परिषदेत बघायला मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राज्यात मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर मतदारसंघ, कोकण पदवीधर तसेच नाशिक विभाग शिक्षक मतदारसंंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या चार जागांसाठी येत्या 26 जून 2024 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधान परिषदेच्या चारही जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीत एकत्र राहूनही इतर घटक पक्षांशी चर्चा न करताच ठाकरेंनी विधान परिषदेच्या (Legislative Council) जागांवर उमेदवार जाहीर केल्याने महाविकास आघाडी विशेषतः काँग्रेसकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) लंडनला गेले होते, त्यावेळी मी त्यांना फोन केला होता. दोन जागा तुम्ही लढा, दोन जागा आम्ही लढतो, असे मी त्यांना सांगितले होते. त्यावेळी त्यांनी तुमच्याकडून कोण लढणार आहे, असं विचारलं. मी त्यांना आमच्या दोन इच्छूक उमेदवारांची नावं सांगितली.

नाशिकमध्ये आमचे जे संभाव्य उमेदवार होते, त्यांनाच ठाकरेंनी बोलावून घेत तिकिट जाहीर करून टाकलं. उद्धव ठाकरे यांनी शरद पवार, काँग्रेस, कम्युनिस्ट पक्षाशी चर्चा करूनच हे उमेदवार जाहीर करायला हवे होते. चर्चा करून निर्णय घेतला असता तर या चारही जागा जिंकणं आम्हाला सोपं झालं असतं. आता त्यांनी चारही जागांवर उमेदवार घोषित केले आहेत, असे पटोले यांनी नमूद केले.

Nana Patole-Uddhav Thackeray
Uday Samant : शरद पवारसाहेब, युवा नेत्यांना ‘हा’ सल्ला द्या... : उदय सामंत

मी त्यांना अनेकवेळा फोन केले. त्या वेळी त्यांचे ऑपरेटर सांगत होते की, ‘साहेब तयार होत आहेत, त्यामुळे माझा त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. उद्धव ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे, हे त्यांना भेटल्यानंतरच कळेल, असेही ते स्पष्ट केले.

ते म्हणाले, मुंबईत आम्ही उमेदवार देणार नाही. मुंबईत त्यांचा इंटरेस्ट राहतो, हे आम्हालाही माहिती आहे, त्यामुळे मुंबईचा काही विषय नव्हता. पण ठाकरेंनी परस्परच आपले उमेदवार जाहीर केले आहेत. आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुका लढल्या पाहिजेत, अशी आमच्या काँग्रेस पक्षाची भूमिका आहे.

Nana Patole-Uddhav Thackeray
Raj Thackeray : शपथविधीचे राज ठाकरेंना निमंत्रण नाही; मुनगंटीवार, खरोखरच इतकी घाईगडबड होती?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com