Shinde and Thackeray  Sarkarnama
मुंबई

Shinde Vs Thackeray : एकनाथ शिंदे पुन्हा ठाकरेंना मोठा धक्का देणार? आमदार, खासदारांनंतर आता मोर्चा...

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरु...

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : मागील वर्षी जून महिन्यात उध्दव ठाकरेंना आव्हान देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदार व १३ खासदारांनी बंडखोरी केली होती. यानंतर सातत्यानं शिंदेंनी ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के देत राज्यात विविध ठिकाणी आजी माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात आणलं. पण तळागळातील जुन्या शिवसैनिकांना पक्षात आणण्यासाठी शिंदे प्रयत्नशील आहे. यासाठी त्यांनी मास्टर प्लान आखला आहे. त्यासंबंधी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा, महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पक्षबा्ंधणीच्या दृष्टीनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचा प्रचार आणि प्रसार व्हावा, खऱ्या शिवसैनिकांना खरी शिवसेना कोणाची, हे कळावे यासाठी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर, तसेच रॉबिन शर्मा यांच्या एका कंपनीकडे यासंदर्भातील काम देण्यात आले आहे.

राज्यातील सत्तासंघर्षाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदेंना मिळाले. त्याच पार्श्वभूमीवर तळागळातील शिवसैनिकांच्या पाठिंब्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

काय आहेत प्लान..?

उद्धव ठाकरे यांची साथ सोडत खासदार,आमदार,नगरसेवक तसेच पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत असले तरी तळागळातला शिवसैनिक नेमका कोणाच्या पाठीशी आहेत हे एक अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे शिवसेनेला जुन्या शिवसेनेतील शिवसैनिकांचा मजबूत पाठिंबा मिळावा, तसेच पक्षाचा राज्यात झपाट्याने प्रसार व्हावा, यासाठी आगामी काळात वेगवेगळे उपक्रम राबविले जाणार आहेत. त्याचाच भाग म्हणून पक्षाची रणनीती आखण्यासाठी एका राजकीय सल्लागार कंपनीची नेमणूकही करण्यात आली आहे.

सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण, निकाल बाकी...

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी तब्बल नऊ महिन्यानंतर पूर्ण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्यातील सुप्रीम कोर्टातील सुनावणी गेल्या काही नऊ महिन्यापासून कोर्टात सुरु होती. मागील नऊ दिवसांपासून लागोपाठ सुनावणी घेण्यात आली. आता सुप्रीम कोर्टानं हा निकाल राखून ठेवला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT