Uddhav Thackeray slams chandrashekhar bawankule : दोन दिवसापासून सुरु असलेला ठाकरे गट- भाजपमधील 'फडतूस-काडतूस' वाद थांबण्याचे नाव घेत नाही. फडतूस, काडतूस,आणि नपुंसक या शब्दांभोवती राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.
आजच्या (गुरुवार) 'सामना'च्या अग्रलेखातून शब्दांचे काडतूस उडवण्यात आले आहेत. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याचा प्रकार नुकताच घडला आहे.
यावरुन शिवसेना-ठाकरे गटातील नेते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्यात जुंपली आहे. त्यानंतर ठाकरे गट-भाजप यांच्यात शाब्दीक युद्ध सुरु आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर अग्रेलेखातून जहरी टीका करण्यात आली आहे.
तुम्ही सर्व एकजात पाद्रे पावटेच..
'फडतूस'शब्दांवरुन बावनकुळे यांनी ठाकरे गटाला प्रत्यत्तर दिले होते. बावनकुळेंनी डिवचल्यानंतर त्याला ठाकरे गट उत्तर देणारचं, "तुम्ही सर्व एकजात पाद्रे पावटेच आहात. भाजपच्या चवन्या आणि ‘बावन’ आण्यांना इतका थयथयाट करण्याचे कारण काय? असा घणाघात अग्रलेखातून चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर करण्यात आला आहे. निशाणा साधला आहे.
तुमचे कर्तृत्व तरी काय?
"फडणवीस म्हणतात मी काडतूस आहे… हम घुसेंगे… आम्ही म्हणतो साहेब, किधर घुसेंगे? एकदा काय ते स्पष्ट करा. तिकडे चीन अरुणाचलमध्ये आतमध्ये घुसला आहे. त्या चीनचे काय करणार आहात? चीनचे जे काडतूस घुसले आहे ते तुमच्या त्या बावन आण्यांना काढायला सांगा. केंद्रीय तपास यंत्रणा हाताशी नसेल तर तुमचे कर्तृत्व तरी काय? तुम्ही तुमच्या पायावर तरी उभे राहाल का? तुमच्या काडतुसांची दारू ही केंद्रीय यंत्रणांची आहे. नाही तर तुम्ही सगळे एकजात पाद्रे पावटेच आहात, अशा शब्दात अग्रलेखातून भाजपचा समाचार घेतला आहे. आता भाजप त्यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्राला नपुंसक बनवणाऱ्यांना फडतूस नाही म्हणायचे तर काय म्हणायचे?
तुमची फुकटची फौजदारी दिल्लीच्या जोरावर आहे.
उद्या हे औटघटकेचं राज्यही जाईल आणि फुकट फौजदारी करणाऱ्यांना जनता बरखास्तही करेल
राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा मुडदा पडला आहे.
भिजलेली काडतुसे आपल्याच मस्तीत दंग आहेत. शेतकरी ठिकठिकाणी आत्महत्या करत आहेत.
आपण फडतूस आहोत की भिजलेले काडतूस आहोत हे तुम्हीच ठरवा
(Edited By Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.