Eknath Shinde  sarkarnama
मुंबई

Video Eknath Shinde : अजितदादांकडून 'लाडकी बहीण' योजना हायजॅक? CM शिंदेंचा मोठा निर्णय

Eknath Shinde Shivsena : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारने जाहीर करून महिलांच्या खात्यात पैसे जमा देखील केले. ही योजना विधानसभेला गेमचेंजर ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Roshan More

Eknath Shinde News : विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. लोकसभेत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशाने महायुती खडबडून जागी झाली आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले आहे.

अजित पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मुख्यमंत्री शब्द वगळून जाहीर केल्याने शिंदे गट नाराज झाला होता. मुख्यमंत्री शिंदेंनी आपली नाराजी व्यक्त केली. शेवटी या योजनेचा प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांचा फोटो वापरून 'लाडकी बहीण घर भेट' योजना सुरू केली आहे. यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (मंगळवारी) 15 कुटुंबांची भेट घेणार आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारने जाहीर करून महिलांच्या खात्यात पैसे जमा देखील केले. ही योजना विधानसभेला गेमचेंजर ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, माझी लाडकी बहीण योजनेसह अनेक योजना नागरिकांसाठी आम्ही राबवल्या आहेत. आता 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कुटुंब भेट' ही योजना करत आहे. 15 कुटुंबाची रोज एक शिवसैनिक भेट घेणार.मी स्वतः पण 15 कुटुंबांना भेट देणार आहे.

शिवसैनिक टाॅप दहा योजनांची माहिती घरोघरी जाऊन देण्यात येणार आहेत. त्या मोहिमेची सुरुवात उद्या (मंगळवार) पासून करण्यात येत येणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्यांना लाभ झालाय त्यांना आणि नाही झाला त्यांची भेट घेतली जाणार. ज्यांना योजनांचे लाभ मिळाला नाही त्यांच्या अडचणी दूर केल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, शेतकऱ्यांसाठी योजना, कामगार कल्याण योजना, महिला बचत गट अशा टॉप 10 योजना लोकांपर्यंत पोचल्या का ? याची माहिती घेणार. आणि ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांना कसा लाभ देता येईल यावर आम्ही लक्ष देणार आहोत, असे देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT