Mumbai News, 13 Feb : विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा (Shivsena) कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. तर दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना बॅक फुटवर आल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात गळती सुरु आहे.
अनेक माजी आमदारांसह पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते सध्या शिंदे गटात प्रवेश करत आहेत. राजकीय भवितव्याचा विचार करत हे सर्वजण एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश करत असल्याचं दिसत आहेत.
अशातच आज कोकणातील राजापूर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) हे ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण राजन साळवी हे कोकणातील दिग्गज नेते आहेत. याआधीच्या अनेक निवडणुकीत साळवी यांनी राजापूर विधानसभेचा गड राखला होता.
मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. साळवी यांच्या जाण्याने ठाकरे गटाला मोठं खिंडार पडणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना मोठा धक्का दिल्याचं पाहायला मिळत आहे. पण एकनाथ शिंदेंनी फक्त उद्धव ठाकरेंनाच (Uddhav Thackeray) नव्हे तर मनसेचे सर्वेसर्वे राज ठाकरेंना देखील धक्का दिला आहे.
कारण मनसेचा गड मानला जाणाऱ्या नाशिकमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका माजी नगरसेवकाने शिवसेनेत प्रवेश केला आहे. या नगरसेवकासोबत काही मनसैनिकांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. मनसेचे सातपूर प्रभाग समितीचे माजी सभापती, माजी नगरसेवक असलेल्या योगेश शेवरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
तसंच ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक पवन पवार यांच्यासह काँग्रेस महिला आघाडीच्या नाशिक जिल्ह्याध्यक्षा वंदनाताई पाटील यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला आहे. त्यामुळे सध्या शिंदेंची शिवसेनेचा आलेख पक्षप्रवेशाच्या बाबतीत चढता असल्याचं पाहायला मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.