Eknath shinde supporter MLA
Eknath shinde supporter MLA Sarkarnama
मुंबई

एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा होताच बंडखोर आमदार बेभान होऊन नाचले!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईत घोषणा करताच राज्यातील शिंदे समर्थक आणि गोव्यातील आमदारांनी एकच जल्लोष केला. अनेक आमदार बेभान होऊन नाचले. काहींना तर एवढा आनंदा झाला होता की, हे आमदार चक्क टेबलावर चढून नाचले. त्यामुळे फडणवीसांनी दिलेल्या धक्क्यातून महाराष्ट्र सावरला नाही तोच शिंदे समर्थक आमदारांनी आनंदोत्सव साजरा केला. (Eknath Shinde's name was announced as the Chief Minister, the rebellious MLAs celebrated)

एकनाथ शिंदे हे दहा दिवसांनंतर आज (ता. ३० जून) राज्यात परतले. मुंबई विमानतळावर त्यांना घेण्यासाठी भाजपचे तब्बल पाच आमदार पोचले होते. विमानतळावरून शिंदे हे थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोचले होते. त्या ठिकाणी भाजप नेत्यांबरोबर त्यांची अर्धा तास खलबते झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे एकाच गाडीतून राजभवनाकडे गेले. त्याच ठिकाणी शिंदे यांच्या नावाचे पत्र भाजप आणि शिंदे गटाकडून राज्यपालांना देण्यात आले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी अवघ्या महाराष्ट्राला धक्का देणारा निर्णय जाहीर केला. शिवसेनेतील बंडापासून आजपर्यंत सर्वांचा होरा हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील, असाच होता. मात्र, भल्या भल्या राजकीय पंडितांना चकवा देणारा निर्णय फडणवीस यांनी जाहीर केला. खरे तर फडणवीस यांच्या घोषणेने ही अवघ्या राज्याला आश्चर्यचकीत केले. मात्र, शिंदे समर्थकांनाही तो एक सुखद धक्का होता.

इकडे, मुंबईत फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करताचा तिकडे गोव्यात असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि शिंदे समर्थकांनी एकच जल्लोष केला. गोवा येथील ताज हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याची बातमी येऊन धडकली आणि त्यानंतर शिंदे समर्थक आणि आमदारांनी एकच जल्लोष केला. अनेक आमदार बेभान होऊन नाचत होते. त्यातील काहींनी तर चक्क टेबलावर चढून आनंदोत्सव साजरा केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT