देवेंद्र फडणवीस असणार नव्या सरकारचे ‘शरद पवार’!

गेल्या दहा दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय अनिश्चिततेचा क्लायमॅक्स देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या राज्याला धक्का देणारा निर्णय घेत केला आहे.
Sharad Pawar-Eknath Shinde-Devendra Fadnavis
Sharad Pawar-Eknath Shinde-Devendra FadnavisSarkarnama

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (३० जुलै) ‘मास्टर स्ट्रोक’ लगावत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना बसवून अवघ्या राज्याला धक्का दिला आहे. अनेक रथी-महारथींचे अंदाज फोल ठरवत फडणवीसांनी शिंदेंना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवत एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचाही प्रयत्न केला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी कोणाच्याही ध्यानीमनी नसताना महाविकास आघाडीचा प्रयोग करत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले होते. अगदी त्याच पद्धतीने फडणवीसांनी शिंदेंना मुख्यमंत्री केले आहे, त्यामुळे फडणवीस हे नव्या सरकारचे शरद पवार असणार हे उघड आहे. (Devendra Fadnavis to be the new government's 'Sharad Pawar'!)

गेल्या दहा दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय अनिश्चिततेचा क्लायमॅक्स देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या राज्याला धक्का देणारा निर्णय घेत केला आहे. शिवसेनेचे बंडखोर आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार येणार हे निश्चित झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री राजीनामा दिल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र, बंडखोरांचे नेते शिंदे यांना मुख्यमंत्री करून फडणवीस यांनी मात्र मास्ट्रर खेळी केली आहे. त्यामागे ठाकरे यांच्या पाठीमागे असलेल्या आमदारांनाही शिंदे यांच्या बंडांना नावे ठेवण्याची जागाच फडणवीसांनी ठेवली नाही. उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना आवाहन करताना एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनणार असतील तर मी बाजूला व्हायला तयार आहे, असे वक्तव्य केले होते. फडणवीसांनी शिंदे यांना मुख्यमंत्री करून त्यालाही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

Sharad Pawar-Eknath Shinde-Devendra Fadnavis
एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत पवारांनी उद्धव ठाकरेंना चार वेळा अलर्ट केले होते....

देवेंद्र फडणवीस स्वतः या मंत्रीमंडळात सहभागी होणार नाहीत. ज्या पद्धतीने शरद पवार यांनी २०१९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना एकत्र आणत महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवले होते. अगदी त्या पद्धतीची खेळी फडणवीस यांनी आज खेळली आहे. ठाकरे यांनी राजीनामा देताना केलेले भावनिक आवाहन राज्यातील बहुतांश लोकांना भावले होते. ती भावनिक सहानुभूती मोडून काढण्यासाठीही फडणवीस यांनी पाऊल टाकले असू शकते.

Sharad Pawar-Eknath Shinde-Devendra Fadnavis
बंडखोर एकनाथ शिंदेंच्या स्वागताला पोचले भाजपचे बडे पाच आमदार!

येत्या काही दिवसांत मुंबईसह राज्यभरातील महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्यात मुंबई, ठाणे पट्ट्यात शिवसेनेचा प्राण आहे. शिवसेनेच्या शक्तीस्थानवर घाव घालण्याची तयारी या माध्यमातून केली आहे, असा सूरही सोशल मीडियात लगेच उमटू लागला आहे. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतर हातात आलेली सत्ता गेल्याची सल फडणवीस अजूनही विसरलेले नाहीत, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या खांद्याचा वापर करून शिवसेनेवर बाण सोडण्याची तयारी भाजपने केली तर नाही ना, असे प्रश्न उपस्थित होते आहेत.

Sharad Pawar-Eknath Shinde-Devendra Fadnavis
पिंपरीत भाजपची सत्ता पुन्हा येणार का...? उमा खापरे म्हणाल्या...‘ऑफ कोर्स येणार!’

एकंदरीतच, एकनाथ शिंदे हे जरी महाराष्ट्राचे ३० मुख्यमंत्री असले तरी सर्व सूत्रे ही देवेंद्र फडणवीस यांच्या हातात होती. महाविकास आघाडीचे शरद पवार ज्याप्रमाणे सर्वेसर्वा होते, त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे शिंदे सरकारचे बॉस असणार आहेत. त्यामुळे शिंदे सरकारचे देवेंद्र फडणवीस हे शरद पवार असणार आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com