Thackeray Vs Shinde
Thackeray Vs Shinde Sarkarnama
मुंबई

Thackeray Vs Shinde: शिंदेंना घेरण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी !१६ आमदारांच्या अपात्रतेसाठी विधानसभा उपाध्यक्षांची...

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी (दि.११) निकाल दिला. या निकालात न्यायालयानं शिंदे गट आणि तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले. शिंदे गटाने नियुक्त केलेले मुख्य प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती देखील घटनाबाह्य असल्याचं म्हटलं. तसेच १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे अधिकार सोपवण्यात आला.

आता न्यायालयाच्या निकालानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून ठाकरे गटानं १६ आमदारांच्या अपात्रतेसाठी आक्रमक रणनीती आखली आहे. त्याचाच भाग म्हणून ठाकरे गटाचं शिष्टमंडळानं लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी करणारं निवेदन आज (दि.१५) विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ(Narhari Zirwal) यांना दिल्याची माहिती ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी दिली आहे. अध्यक्ष परदेश दौर्यावर असल्यानं उपाध्यक्षांना निवेदन दिलं असल्याचंही ते म्हणाले.

ठाकरे गटाचं शिष्टमंडळ विधानभवनात दाखल झालं. यात ठाकरे गटाचे नेते, सुनील प्रभू, अनिल परब,आमदार सुनील राऊत, विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर(Sachin Ahir), विधान परिषदेचे मनिषा कायंदे हे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

यावेळी ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर म्हणाले, आम्ही सर्व आमदार एकत्र आलेलो आहेत. पक्षाचे प्रमुख नेते आल्यावर आमची पुढची रणनीती ठरणार आहे. आम्ही आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातलं पत्र विधानसभा सचिवांना देणार होते. मात्र, त्यांनी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे निवेदन दिलं आहे.

सचिन अहिर काय म्हणाले?

विधानसभेचे सचिव उपस्थित नसले तरी त्यांच्यानंतरचे उपचसिव आहेत त्यांना पत्र द्यायचं की नाही यावरही विचार होऊ शकतो. विधानसभेचे अध्यक्ष आज मुंबईत येणार आहेत. त्यांचं कार्यालय ज्याला आपण ऑफिस ऑफर स्पीकर असं म्हणतो येथे नोंद करण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याची माहिती देखील अहिर यांनी यावेळी दिली.

न्यायालयानं एकनाथ शिंदें(Eknath Shinde)ना मोठा झटका दिला आहे.कोणताही गट अपात्रतेच्या कारवाईच्या बचावासाठी मूळ पक्ष असल्याचा युक्तिवाद करू शकत नाही असं कोर्टाने स्पष्टपणे म्हटले आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाचा व्हीप म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती करण्याचा सभापतींचा निर्णय बेकायदेशीर असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. तसेच सुनील प्रभू हेच मुख्य प्रतोद असल्याचंही अहिर यांनी यावेळी म्हटलं.

''...म्हणून नार्वेकरांनी दौरा सोडून यायला हवं होतं!''

अहिर म्हणाले, विधानसभेच्या अध्यक्षांच्या कुठल्याही निर्णयाबद्दल आत्ता वाच्यता करणं किंवा आत्ता भाकित करणं उचित ठरणार नाही. ते आल्यावर आम्ही आमचा युक्तिवाद करू. मुळात अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी याप्रकरणी त्वरित कारवाई करायला हवी होती. त्यांनी यासाठी दौरा सोडून यायला हवं होतं.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT