Pune NCP News: राष्ट्रवादीला मोठं खिंडार : 'मिशन बारामती' मध्ये बडा नेता भाजपमध्ये..; उद्या कमळ हाती घेणार

NCP Leader Ashok Tekwade is Going to Join BJP: पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
 Ashok Tekwade
Ashok TekwadeSarkarnama

Pune News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. 'मिशन बारामती'मध्ये पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा बडा मासा भाजपच्या गळाला लागला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उद्या (मंगळवारी) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये अशोक टेकवडे कमळ हाती घेणार आहेत. (big leader of ncp Ashok Tekwade is going to join bjp) टेकवडे यांना याबाबत "सरकारनामा"ने विचारला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.

 Ashok Tekwade
Karnataka CM News : कर्नाटकात CM पदावरुन पोस्टर वॉर सुरु : डी.के. शिवकुमार अन् सिद्धरामय्या यांच्या..

"राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पुरंदरमधील भाजप पदाधिकारी यांच्या उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यालयात मी व माझा मुलगा बारामती लोकसभा मतदार संघाच्या युवक राष्ट्रवादी काँग्रेस समितीचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे व काही कार्यकर्ते मिळून आम्ही पक्ष प्रवेश करीत आहोत, असे टेकवडे यांनी सांगितले.

"2019 च्या निवडणुकांमध्ये अमेठीमधील गांधी कुटुंबाची मक्तेदारी राहुल गांधींच्या पराभवाने संपुष्टात आली. जर आम्ही हे अमेठीत करु शकतो तर हे बारामतीमध्येही आम्ही करु शकतो, " असे विधान भाजपचे नेते राम शिंदे यांनी केलं होतं.

महाराष्ट्रातील पाच मतदार संघातून आतापासूनच भाजपने मोर्चेबांधणी केली आहे. त्यासाठी पहिल्यांदा बारामती लोकसभा मतदार संघाची निवड करण्यात आली आहे.त्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचा दौऱ्याही झाला आहे. टेकवडे यांच्या भाजप प्रवेशानंतर आता "मिशन बारामती"स सुरवात झाली आहे.

 Ashok Tekwade
Maharashtra Politics : शिंदे-फडणवीसांमध्ये श्रेयवादावरुन लढाई ; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर फडणवीसाचं टि्वट.. म्हणाले...'

अशोक टेकवडे यांचा राजकीय प्रवास...

टेकवडे हे त्यांचे वडील पुरंदर तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य कै. कोंडीबा उर्फ टेकवडे यांची राजकीय जीवनापासूनच एस काँग्रेस, काँग्रेस व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडले गेलेले आहेत. प्रारंभी 1990 दरम्यान अशोक टेकवडे हे युवक काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे ते निकटवर्ती समजले जात. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी विजय कोलते यांनी प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळाचा राजीनामा दिल्यावर अजित पवार यांनी निवड मंडळावर 1993 मध्ये अशोक टेकवडे यांना हे पद दिले.

अजितदादांनी संधी दिली..

तेव्हापासून त्यांचे नेतृत्व खऱ्या अर्थाने विकसीत झाले. पुढे सन 2001 मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संचालक म्हणून अजित पवार यांनी त्यांना संधी दिली. त्यातून पुढे जिल्हा बँकेचे काही काळासाठी टेकवडे अध्यक्षही झाले.अजित पवार यांनी टेकवडे यांचे नेतृत्व नवा चेहरा म्हणून आणखी पुढे आणले. सन 2004 च्या विधानसभा निवडणुकीत पुरंदर -हवेली मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी टेकवडे यांना पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मिळवून देण्यात अजित पवार यशस्वी झाले. माजी आमदार,काँग्रेस नेते कै. चंदुकाका जगताप यांनी आघाडी धर्म पाळत साथ दिल्याने सुमारे 14 हजारांच्या मताधिक्याने अशोक टेकवडे धर्मनिरपेक्ष जनतादल नेते तथा माजी राज्यमंत्री दादा जाधवराव यांचा पराभव करीत निवडून आले. त्यातून पुरंदरमध्ये राजकीय भाकरी फिरविली गेली. (Political Web Stories)

 Ashok Tekwade
BJP win first in deoband : उत्तर प्रदेशात मुस्लिम बहुल क्षेत्रात १४० वर्षानंतर कमळ फुललं ; पहिले हिंदू नगराध्यक्ष..

माणिक झेंडे यांच्या कार्यपध्दतीवर नाराज..

राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार यांनी सातत्याने टेकवडे यांना बळ दिले. मात्र 2009 मध्ये त्यांना पक्षाने विधानसभेचे तिकीट नाकारले. त्यावेळी ते प्रचंड नाराज होते, पण पक्ष सोडला नाही. गेली काही वर्षे त्यांनी मुलगा अजिंक्य टेकवडे याचे नेतृत्व विकसीत करण्याकडे लक्ष दिले. मात्र दीडच महिन्यांपूर्वी ते पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिक झेंडे यांच्या कार्यपध्दतीवर नाराज होते. याबाबत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचे लेखी पत्र देऊन लक्ष वेधले होते. मात्र त्याची दखलच पक्षश्रेष्ठींनी घेतली नाही. त्यातून त्यांना मुलासह भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला. (Political Short Videos)

कोणतीही अपेक्षा न ठेवता भाजपमध्ये :टेकवडे

मी पुरंदर-हवेलीचा आमदार होतो. तेव्हापासून लोक त्यांची कामे घेऊन माझ्याकडे येतात. काहींची गावची विकास कामे असतात. काही व्यक्तीगत कामे घेऊन येतात. शेतकऱ्यांची विविध प्रश्न आहेत. ही कामे मार्गी लागली नाही, तर लोकांना काय उत्तर द्यायचे. त्यात मी मांडलेल्या काही मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दखल घेतली नाही. माझ्याकडे लक्ष न देण्याचा तो पक्षाचा निर्णय असेल. त्यामुळे मी जनतेच्या विकासाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला. कोणतीही अपेक्षा न ठेवता, लोकहितासाठीच मी हा भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला आहे, असे टेकवडे यांनी "सरकारनामा"शी बोलताना सांगितले.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com